'उतरन' फेम स्पर्श कंचनदानी पाच वर्षानंतर करणार छोट्या पडद्यावर कमबॅक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2018 06:00 AM2018-11-07T06:00:00+5:302018-11-07T06:00:00+5:30
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'उतरन'मध्ये इच्छाच्या भूमिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री स्पर्श कंचनदानी लवकरच छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आ
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'उतरन'मध्ये इच्छाच्या भूमिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री स्पर्श कंचनदानी लवकरच छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. आता ती १७ वर्षांची झाली असून तब्बल पाच वर्षानंतर 'विक्रम बेताल' माालिकेत दिसणार आहे. तिने शेवटचे परवरिश मालिकेत काम केले होते. शिक्षण पूर्ण करायचे होते म्हणून तिने मालिका सोडली होती. 'विक्रम बेताल' मालिकेत स्पर्श भूताच्या भूमिकेत दिसणार आहे.
स्पर्शने मालिकेत कमबॅक करण्याबाबत सांगितले की, 'माझे वडील वकील आहेत, त्यामुळे मलाही वकील व्हायचे आहे आणि समाजासाठी काम करण्याची इच्छा आहे. मात्र मी अभिनय करावा अशी माझ्या आईची तीव्र इच्छा आहे. मला टीव्हीवर पाहणे तिला आवडते. तिच्यासाठी मी पुनरागमन केले.
स्पर्श विक्रम बेताल मालिकेत तरुण भूत 'टायनी टिंकर वेल'चे पात्र साकारत आहे. ती वेताळची चांगली मैत्रीण असते. माझ्या आणि वेताळमध्ये टॉम आणि जैरीसारखी मैत्री पाहायला मिळेल. हे पात्र खूपच निरागस आहे. ते विक्रमला त्रास देण्यासाठी वेताळची मदत करत असते.'
खरेच मला अभिनयात करियर करायचे नव्हते. मला बऱ्याच ऑफर मिळाल्या होत्या मात्र त्यांची संकल्पना मला आवडली नव्हती. जी संकल्पना आवडत नाही, त्या भूमिकेला मी न्याय देऊ शकणार नाही, असे मला वाटते. त्यामुळे त्या भूमिका केल्या नाहीत. मला जी गोष्ट जास्त आवडते त्यावरच मी जास्त लक्ष दिले ते म्हणजे माझे शिक्षण. मला वकील व्हायचे आहे आणि समाजासाठी काम करायचे आहे. माझे वडील वकील आहेत त्यामुळे मलाही त्यांच्यासारखे व्हायचे आहे. मात्र माझ्या आईला अभिनायचे प्रचंड वेड आहे. मला पडद्यावर पाहणे तिला आवडते. तीच मला अभिनय करण्यासाठी प्रेरित करत असते. विकम वेताळसाठी मला महिन्यातून 6 ते 7 वेळेसच काम करावे लागते. त्यामुळेच मी मालिकेला होकार दिला होता, असे स्पर्शने सांगितले.