'वडापाव गर्ल'चा डाव संपला, चंद्रिका दीक्षित Bigg Boss OTT 3 मधून बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 10:53 AM2024-07-15T10:53:55+5:302024-07-15T10:54:58+5:30

दिल्लीची वडापाव गर्ल अशी ओळख असणाऱ्या चंद्रिका दीक्षितला Bigg Boss OTT 3 मधून बाहेरचा रस्ता धरावा लागतोय

Vadapav Girl chandrika dixit eliminated from Bigg Boss OTT 3 | 'वडापाव गर्ल'चा डाव संपला, चंद्रिका दीक्षित Bigg Boss OTT 3 मधून बाहेर

'वडापाव गर्ल'चा डाव संपला, चंद्रिका दीक्षित Bigg Boss OTT 3 मधून बाहेर

 Bigg Boss OTT 3 ची सध्या चांगली चर्चा आहे. यंदाचं पर्व अनेक कारणांमुळे गाजतंय. अशातच Bigg Boss OTT 3 मध्ये काल वीकेंड का वारमध्ये बिग बॉसमधील आणखी एक एलिमिनेशन पार पडलं. यावेळी एक आश्चर्यचकीत निकाल समोर आला. तो म्हणजे  Bigg Boss OTT 3 मधून वडापाव गर्ल अशी ओळख असणारी चंद्रिका दीक्षित घराबाहेर पडली आहे. कमी मतं मिळाल्याने चंद्रिकाला घराबाहेर जावं लागलं आहे.

वडापाव गर्ल  Bigg Boss OTT 3 मधून बाहेर

चंद्रिका जेव्हा Bigg Boss OTT 3 मध्ये आली तेव्हा तिची बाहेर जी वादग्रस्त प्रतिमा होती ती बदलण्याचा तिचा उद्देश होता. परंतु बिग बॉसमध्येही तिचा प्रवास वादग्रस्त ठरला. तिला घरात ढोंगी आणि नाटकी म्हणून ओळखले जाऊ लागले. अलीकडील वीकेंड का वारमध्ये तिने विशाल पांडे - कृतिक मलिक प्रकरणात तिच्यावर झालेल्या आरोपांचा सामना करताना पाहिले. याशिवाय होस्ट अनिल कपूर यांनी तिला घरात नकारात्मकता पसरवणं याशिवाय साई केतन रावबद्दल खोटी प्रतिमा तयार केल्याबद्दल तिला फटकारले. अखेर Bigg Boss OTT 3 मधून चंद्रिका दीक्षितला घराबाहेर जावं लागलं.

कोण आहे वडापाव गर्ल?

'वडापाव गर्ल' अशी ओळख असलेली चंद्रिका आधी पूर्णवेळ नोकरी करायची. पण जेव्हा कोविडच्या काळात तिच्या मुलाची तब्येत बिघडली तेव्हा चंद्रिका आणि तिचा पती यश गेरा यांना नोकरी सोडावी लागली. दोघांनीही आपल्या मुलाची काळजी घेण्याचा निर्णय घेतला. यानंतर दोघांनी दिल्लीत वडापावचा स्टॉल लावला आणि काही वेळातच त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. मुंबई स्टाईलमध्ये वडापाव विकण्याची चंद्रिका आणि तिच्या नवऱ्याची कल्पना एकदम शानदार असल्याने लोकांची गर्दी होऊ लागली. 

Web Title: Vadapav Girl chandrika dixit eliminated from Bigg Boss OTT 3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.