"मालवणी ही मराठी भाषा नाही..."; वैभव चव्हाणचं बिग बॉसमध्ये मोठं विधान, नेटकऱ्यांची नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 11:49 AM2024-08-13T11:49:18+5:302024-08-13T11:49:58+5:30

वैभव चव्हाणकडून काल बिग बॉसच्या घरात मालवणी भाषेचा अपमान झाल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. काय घडलंय नेमकं बघा (Bigg Boss Marathi 5)

Vaibhav Chavan big insult malvani language in Bigg Boss marathi 5 ankita walawalkar | "मालवणी ही मराठी भाषा नाही..."; वैभव चव्हाणचं बिग बॉसमध्ये मोठं विधान, नेटकऱ्यांची नाराजी

"मालवणी ही मराठी भाषा नाही..."; वैभव चव्हाणचं बिग बॉसमध्ये मोठं विधान, नेटकऱ्यांची नाराजी

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये काल सदस्यांना नवीन टास्क देण्यात आला. घरात पाहुणे म्हणून दोन जुळ्या बाळांची एन्ट्री झाली. घरात दोन टीम पाडून प्रत्येक टीमला एक बाळ देण्यात आलं. या बाळांना सदस्यांना खेळवायचं होतं. बाळांना फक्त मराठी भाषाच समजते, असा नियम बिग बॉसने घालून दिला होता. त्यावेळी अंकिताने बाळाला खेळवताना मालवणी भाषा वापरल्याने वैभवने घरात गोंधळ घातला. काय झालं नेमकं बघा. 

मालवणी ही मराठी भाषा नाही: वैभव

काल घडलेल्या टास्कमध्ये एका टीमकडून वैभव संचालक होता. दुसऱ्या टीमकडून अंकिता बाळाला खेळवत होती. त्यावेळी तिने मालवणी भाषेेचा वापर केला. ही भाषा बोलली तर चालेल का हे तिने वैभवला विचारलं. पण वैभवने घरात एकच गोंधळ घातला. मालवणी ही मराठी भाषा नाही, बिग बॉसने मराठी भाषेचा वापर करायला सांगितलं आहे, असं म्हणत वैभवने अंकिताच्या टीमविषयी तक्रार फळ्यावर लिहायला घेतली.


 वैभवला मराठी लिहिता येईना

वैभवने जेव्हा अंकिताची तक्रार लिहायला घेतली तेव्हा त्याने भाषा हा शब्द भाशा असं लिहिला. मराठी भाषा म्हणणाऱ्यांना मराठी लिहिता येत नाही, असं म्हणत अंकिताने वैभवची चूक सर्वांच्या निदर्शनास आणून दिली. दरम्यान वैभवने मालवणी ही मराठी भाषा नाही असं म्हटल्याने नेटकऱ्यांनी त्याच्यावर चांगलीच नाराजी दर्शवली आहे. मालवणी मराठी भाषाच आहे, वैभवला श आणि ष यातला फरक कळत नाही असं म्हणत नेटकऱ्यांनी वैभववर चांगलीच नाराजी प्रकट केलीय. 

Web Title: Vaibhav Chavan big insult malvani language in Bigg Boss marathi 5 ankita walawalkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.