वैभवीच्या निधनानंतर होणाऱ्या नवऱ्याची भावूक पोस्ट, म्हणाला, "तुझ्यासोबतच्या त्या खास..."
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 01:47 PM2023-05-30T13:47:05+5:302023-05-30T13:48:12+5:30
अभिनेत्री वैभवी उपाध्याय आणि जय गांधी डिसेंबरमध्ये लग्नबंधनात अडकणार होते.
'साराभाई व्हर्सेस साराभाई' फेम अभिनेत्री वैभवी उपाध्यायचा (Vaibhavi Upadhyay) हिमाचल प्रदेश येथे अपघातातमृत्यू झाला. ती तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी हिमाचल प्रदेशच्या निसर्गरम्य वातावरणात गेली होती. दरम्यान एका ठिकाणी वळण घेत असतानाच त्यांची गाडी दरीत कोसळली. यात वैभवीचा जागीच मृत्यू झाला तर तिचा होणारा नवरा जय गांधी (Jay Gandhi) वाचला. वैभवीच्या मृत्यूने त्याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला असून त्याने एक भावनिक पोस्ट केली आहे.
अभिनेत्री वैभवी उपाध्याय आणि जय गांधी डिसेंबरमध्ये लग्नबंधनात अडकणार होते. मात्र त्याआधीच वैभवीवर काळाने घाला घातला. जय गांधीने सोशल मीडियावर वैभवीसोबतचा एक फोटो शेअर करत लिहिले, " आपण परत भेटेपर्यंत….तुझ्यासोबतच्या त्या खास आठवणी नेहमी माझ्या चेहऱ्यावर आनंद देत राहतील जर मी तुला थोडावेळ माझ्या आयुष्यात परत आणू शकलो असतो आणि आपण नेहमीसारखंच बसून गप्पा मारल्या असत्या. तुमचा कायम माझ्यासाठी स्पेशल होतीस आणि पुढेही असशील. तू आता इथे नाहीस ही वस्तुस्थिती मला नेहमीच वेदना देत राहील पण आपली पुन्हा भेट होत नाही तोपर्यंत तू कायम माझ्या मनात राहशील…. RIP MY LOVE.."
जय गांधीला वैभवीची खूपच आठवण येत असून त्याने आपल्या भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केल्या आहेत. दरम्यान वैभवीच्या अस्थिंचं विसर्जन नर्मदा नदीत करण्याचं तिच्या कुटुंबियांनी ठरवलं आहे. त्यासाठी ते गुजरातला निघणार आहेत.