महागायिका वैशाली माडे झाली बिग बॉसच्या घराची पहिली महिला कॅप्टन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2019 15:40 IST2019-06-18T15:37:16+5:302019-06-18T15:40:52+5:30
वैशालीने पहिल्या दिवसापासूनच कोणताही मुखवटा न घालता खरेपणाने ह्या रिअॅलिटी शोमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण करत आहे.

महागायिका वैशाली माडे झाली बिग बॉसच्या घराची पहिली महिला कॅप्टन
मराठी बिग बॉस हा रियालिटी शो दिवसेंदिवस रसिकांचा आवडता शो बनत चालला आहे. बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांमधील वाद, कुरघोडीची स्पर्धा, डावपेच, टास्क आणि कधी इमोशनल ड्रामा यामुळे रसिकांना हा शो भावतोय. नुकतेच बिग बॉसच्या घरात चौथ्या आठवड्यात महागायिका वैशाली माडे कॅप्टन झाली आहे. बिग बॉसने दिलेल्या ‘सही रे सही’ ह्या टास्कमध्ये जिंकून वैशाली कॅप्टन झाली आहे. वैशालीने फळ्यावर सर्वाधिक ऑटोग्राफ म्हणजेच 276 स्वाक्ष-या करून कार्य जिंकले.
वैशाली बिग बॉसच्या घरात जाताना म्हणाली होती, “मी जशी आहे, तशीच बिग बॉसच्या घरात राहून घरातल्यांची आणि माझ्या चाहत्यांची मनं जिंकण्याचा मी प्रयत्न करेन.” वैशालीने पहिल्या दिवसापासूनच कोणताही मुखवटा न घालता खरेपणाने ह्या रिअॅलिटी शोमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण करत आहे. म्हणूनच जेव्हा वैशाली कॅप्टन झाली तेव्हा शिवने आणि संपूर्ण घरातल्या स्पर्धकांनी तिचे कॅप्टन रूममध्ये थाटात स्वागत केले.
हिंदी आणि मराठी सिनेमात एक से बढकर एक गाण्याच्या माध्यमातून तिने आपल्या सुरांची जादू दाखवली आहे. मध्यंतरीच्या काळात वैशाली तितकी चर्चेत नव्हती. मात्र बिग बॉस हा मराठी रियालिटी शोमधील एंट्रीने वैशाली पुन्हा रसिकांच्या मनात घर करुन गेली. त्यामुळेच की काय तिच्या प्रत्येक बारीकसारीक गोष्टी जाणून घेण्याची रसिकांना उत्सुकता असते.