Vaishali Takkar Suicide: वैशाली ठक्करच्या मृत्यूवर भावाने सोडलं मौन, वादग्रस्त फोटोंबाबत केला मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 12:59 PM2022-10-18T12:59:13+5:302022-10-18T13:14:02+5:30
सुसाईड नोटमध्ये अभिनेत्रीने तिच्या मृत्यूसाठी शेजारी राहूल नवलानी आणि त्याचा पत्नी दिशा यांना जबाबदार धरले आहे. या सगळ्यात आता वैशालीचा भाऊ आणि वडिलांचे वक्तव्य समोर आले आहे.
टीव्ही अभिनेत्री वैशाली ठक्कर(Vaishali Takkar Suicide)च्या निधनामुळे मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे. वैशालीचे जवळचे मित्र आणि तिचे कुटुंबीय हैराण आहेत. वैशालीने तिच्या वेदना एका डायरीत लिहिल्यात आहेत. पाच पानी सुसाईड नोटमध्ये अभिनेत्रीने तिच्या मृत्यूसाठी शेजारी राहूल नवलानी(Rahul Navlani) आणि पत्नी दिशा यांना जबाबदार धरले आहे. यासोबतच या दोघांनाही शिक्षा देण्याची विनंती केली. या सगळ्यात आता वैशालीचा भाऊ आणि वडिलांचे वक्तव्य समोर आले आहे.
या प्रकरणाबाबत अभिनेत्रीच्या भावाने सांगितले की, 'वैशाली राहुलला तिचा चांगला मित्र मानत होती पण तो तिला बदनाम करण्याची धमकी देत होता. वैशालीने संपूर्ण कथन आपल्या डायरीत केलं आहे. तिनं आपल्या नात्याबद्दलही सांगितले आहे. ते लोक फिरायला गेले असतील, तिथे फोटो काढले असतील. यासाठी तो तिला ब्लॅकमेल करत होता. मी तुझं घर कधीच बसू देणार नाही असे म्हणायचे आणि तसंच केलं. माझ्या बहिणीने गेल्या वर्षी अभिनंदन सिंगसोबत एंगेजमेंट केली होती पण राहुलने अभिनंदनला चुकीच्या गोष्टी सांगून हे नाते पुढे जाऊ दिले नाही.
अभिनेत्रीचा भाऊ पुढे म्हणाला, 'आधी आम्हाला हे सर्व माहित नव्हते, पण आत्महत्या करण्याच्या एक दिवस आधी वैशालीने तिच्या आई-वडिलांना या सर्व गोष्टी सांगितल्या. यानंतर वडिलांनी राहुलच्या वडिलांना फोन करून समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र तो आपल्या कृत्यापासून परावृत्त झाला नाही. आम्ही पोलिसात जाण्याचा विचार करतो होतो पण...ती निघून गेली.'
इंडिया टुडेशी बोलताना वैशालीचे वडील म्हणाले, 'मी माझी मुलगी गमावली आहे, तिला खूप त्रास सहन करावा लागला आहे. आम्हाला न्याय हवा आहे. गेली अडीच वर्षे तिला इतका त्रास सहन करावा लागतोय हे आम्हाला माहीत नव्हते, आम्हाला कल्पना असती तर आम्ही हे होऊ दिले नसते. मुलीचं कोर्ट मॅरेज 20 ऑक्टोबरला होणार होता. राहुलबद्दल काही माहिती असती तर आम्ही कारवाई केली असती.
वैशालीने मृत्यूपूर्वी डायरी लिहिली
मृत्यूपूर्वी वैशाली ठक्करने आपल्या डायरीत राहुल नवलानी विरोधात बरंच काही लिहिलं होतं. तिने आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे की, 'आई-बाबा बस ना आता... अभिनेत्रीने तिच्या कथित डायरीमध्ये लिहिले आहे की, 'एक मुलगी नसेल तेव्हा तिच्याशी संबंधित कोणतीही समस्या देखील राहणार नाही. I Quit माँ, आय लव्ह यू पापा. मी चांगली मुलगी होऊ शकले नाही मला माफ करा.'