वैष्णवी कदम दिसणार दिल बफरिंग या ही वेब सिरीजमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2017 05:14 AM2017-10-14T05:14:53+5:302017-10-14T10:44:53+5:30

‘दिल बफरिंग’ ही वेब सिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून ही वेबसिरिज यू टिव्ही बिंदासची आहे. बोधी ट्री निर्मिती ...

Vaishnavi Kadam will see heart buffering in this web series | वैष्णवी कदम दिसणार दिल बफरिंग या ही वेब सिरीजमध्ये

वैष्णवी कदम दिसणार दिल बफरिंग या ही वेब सिरीजमध्ये

googlenewsNext
िल बफरिंग’ ही वेब सिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून ही वेबसिरिज यू टिव्ही बिंदासची आहे. बोधी ट्री निर्मिती संस्थेच्या 'दिल बफरिंग'मध्ये २४ वर्षांची तरुणी आणि तिच्‍या भूतकाळातील प्रेमसंबंध यांची कथा मांडण्‍यात आली आहे. ही वेब सिरीज म्हणजे आजकालच्या तरुणाईच्या प्रेमसंबंधांवर आणि 'कायम खरे प्रेम शोधत राहण्याच्या' त्यांच्या वृत्तीवर केलेले विनोदी, नाट्यमय असे भाष्य आहे.
प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन क्षेत्रासाठी गुणवंत कलाकार शोधणाऱ्या टॅलेंट नेक्स्ट या ऑनलाईन व्यासपीठाशी निर्मिती संस्थेने केलेल्या भागीदारीतूनच या सिरीजची प्रमुख नायिका वैष्णवी कदम हिला ही संधी मिळू शकली आहे. याविषयी वैष्णवी कदम सांगते, ''या सिरीजसाठी प्रमुख भूमिकेत माझी निवड झाल्याचा मला फार आनंद झाला आहे. टॅलेंट नेक्स्टमधून मला ही संधी मिळाली आहे आणि त्यामुळे निवडप्रक्रियेसाठी मला निर्मितीसंस्थांच्या पायऱ्या झिझवाव्या लागल्या नाहीत. मी थेट त्यांच्या वेबसाईटवर कामासाठी अर्ज केला आणि अत्यंत कमी वेळात हे काम मला मिळाले.''
वैष्णवी कदम या वेब सिरिजमध्ये काम करण्यासाठी खूप उत्सुक असून तिच्यासाठी या वेब सिरिजमध्ये काम करण्याचा अनुभव खूपच चांगला असल्याचे ती सांगते.
बोधी ट्री मल्टीमीडियाचे संस्थापक आणि संचालक मौतिक तोलिया सांगतात, ‘‘आमच्या मनात असलेल्या पात्राशी तंतोतंत जुळणारा कलाकार काही केल्या मिळतच नव्हता. आम्ही गेले कित्येक महिने 'दिल बफरिंग' या वेब सिरिजसाठी फ्रेश चेहरा शोधत होतो. त्यामुळे आमचे पुढचे कामही थांबले होते. टॅलेंट नेक्स्टच्या मदतीने आम्हाला हा नवा चेहरा मिळाला. आपल्या देशात खूप गुणवत्ता आहे पण योग्य वेळी योग्य व्यक्तीची भेट होणे अत्यंत कठीण आहे. टॅलेंट नेक्स्टसारख्या व्यासपीठामुळे चांगले कलाकार मिळतात आणि कलाकार निवडीची प्रक्रियाही कमी वेळात पूर्ण होते.’’
या शोसाठी 'एक योग्य व्यक्ती' शोधण्यासाठी जी धडपड करावी लागली, तीच धडपड या सिरीजमधली तरुणी 'आपली एक खास व्यक्ती' शोधण्यासाठी करते आहे. ही सिरीज हा तिच्या याच धडपडीचा आरसा आहे.

Web Title: Vaishnavi Kadam will see heart buffering in this web series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.