'कबीर सिंग'मधील मोलकरणीच्या भूमिकेनंतर वनिता खरातनं नाकाराल्या बॉलिवूडच्या ऑफर्स, मोठं कारण आलं समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2023 14:24 IST2023-04-26T14:23:43+5:302023-04-26T14:24:36+5:30
Vanita Kharat : 'कबीर सिंग' चित्रपटात वनिता खरातची भूमिका छोटीशी होती. मात्र या भूमिकेनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतले होते.

'कबीर सिंग'मधील मोलकरणीच्या भूमिकेनंतर वनिता खरातनं नाकाराल्या बॉलिवूडच्या ऑफर्स, मोठं कारण आलं समोर
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) अनेक विनोदवीर घराघरात पोहचले आहेत. यातील एक विनोदवीर म्हणजे वनिता खरात (Vanita Kharat). ती सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत येत असते. महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमध्ये काम करण्याआधी वनिता आधी शाहिद कपूरच्याकबीर सिंग (Kabir Singh) या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात तिने मोलकरणीची भूमिका साकारली होती.
कबीर सिंग चित्रपटात वनिता खरातची भूमिका छोटीशी होती. मात्र या भूमिकेनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतले होते. कबीर सिंगमुळे वनिताला नवी ओळख मिळाली. त्यानंतर तिला अनेक बॉलिवूड चित्रपटांच्या ऑफर्स येत आहेत. मात्र ती नाकारत असल्याचे समजते आहे. नुकतेच तिने चित्रपट नाकारण्यामागचे कारण सांगितले आहे. एका मुलाखतीत वनिताने याबद्दल सांगितले.
ती म्हणाली की, आपण एक भूमिका केली नाही की आपल्याला त्याच एका भूमिकेसाठी बोलावतात. कबीर सिंगमध्ये मी मोलकरणीची भूमिका केली होती. त्यामुळे हिंदीमधील सगळ्या कास्टिंग एजेन्सी मला ओळखतात. सगळ्या कास्टिंग एजेन्सीकडे माझे प्रोफाइल्स आहेत. पण ते लोक फक्त मला मोलकरणीच्याच भूमिकेसाठी बोलावतात.
वनिता खरात हिने कॉमेडीची बुलेट ट्रेनमध्ये काम केले असून ती शाहिद कपूरच्या कबीर सिंग या चित्रपटात झळकली आहे. न्यूड फोटोशूटमुळे तिच्या नावाची चांगलीच चर्चा झाली होती. वनिता खरातला आता पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी तिचे चाहते देखील उत्सुक आहेत.