आज खरंच बाबा हवे होते...; विजय चव्हाण यांच्या आठवणीनं भावुक झाला वरद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 01:56 PM2022-03-28T13:56:11+5:302022-03-28T13:56:39+5:30

Varad Vijay Chawan : अनेक भूमिका गाजवणारे, रसिकांना खळखळून हसवणारे ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण आज आपल्यात नाहीत. त्यांचा अभिनयाचा वारसा त्यांचा मुलगा वरद चव्हाण पुढे नेतोय. हाच वरद अलीकडे बाबाच्या आठवणीत भावुक झालेला दिसला.

Varad Vijay Chawan wins colors marathi best supporting actor awarad share emotional post | आज खरंच बाबा हवे होते...; विजय चव्हाण यांच्या आठवणीनं भावुक झाला वरद

आज खरंच बाबा हवे होते...; विजय चव्हाण यांच्या आठवणीनं भावुक झाला वरद

googlenewsNext

अनेक भूमिका गाजवणारे, रसिकांना खळखळून हसवणारे ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण ( Vijay Chawan)आज आपल्यात नाहीत. त्यांचा अभिनयाचा वारसा त्यांचा मुलगा वरद चव्हाण (Varad Vijay Chawan) पुढे नेतोय. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून वरद अभिनय क्षेत्रात आला. खरं तर त्याला नेव्हीमध्ये जायची इच्छा होती. पण नंतर तो अभिनयाकडे वळला.  हाच वरद अलीकडे बाबाच्या आठवणीत भावुक झालेला दिसला. होय, कलर्स मराठी वाहिनीचा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यात वरदला ‘आई मायेचं कवच’ या मालिकेसाठी लोकप्रिय सहाय्यक अभिनेत्याच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं. मालिकेत त्याने साकारलेल्या भास्कर लोखंडे या व्यक्तिरेखेसाठी त्याला हा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारताना वरद भावुक झाला. आज खरंच बाबा हवे होते..., असं म्हणत त्याने सोशल मीडियावर एक भावुक व्हिडीओ शेअर केला आहे.

 ‘10-12 वर्षांच्या खडतर प्रवासानंतर मिळालेली ही पहिली पोचपावती... आज खरंच बाबा हवे होते... पण त्यांनी हा क्षण पाहिला असेल ह्याची पूर्ण खात्री आहे मला...,’असं त्याने व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. मी हा पुरस्कार माझ्या बाबांना समर्पित करतो, असं वरद व्हिडीओत म्हणतोय.
वरद हा विजय चव्हाण यांचा एकुलता एक मुलगा आहे. वरदने छोट्या पडद्यासोबतच मोठ्या पडद्यावरही अभिनयाची चुणुक दाखवली आहे. शिवाय तो रंगभूमीवर रमतो.  वरदने आॅन ड्युटी 24 तास, धनगरवाडा, खोखो, वात्सल्य यांसारख्या अनेक चित्रपटात काम केले आहे. तर छोट्या पडद्यावर तो अजूनही चांद रात आहे, मंगळसूत्र सध्या 100 डेज या मालिकांमध्ये झळकला आहे. 

विजय चव्हाण यांनी वरदला घडवलं.  तू विजय चव्हाण यांचा मुलगा म्हणून नाही तर वरद चव्हाण म्हणून तुझा प्रवास सुरू कर. या प्रवासात येणारं यश आणि अपयश हे सर्व तुझं असेन..., असं विजय चव्हाण यांनी  वरदला करिअरच्या सुरूवातीलाच ठणकावून सांगितलं होतं.  
 
सुपर स्टार विजय चव्हाण यांनी मराठी सृष्टीत विनोदी कलाकार म्हणून स्वत:ची छाप सोडली होती. मोरूची मावशी नाटकातील त्यांनी साकारलेली स्त्री व्यक्तिरेखा विशेष कौतुकास्पद ठरली.वहिनीची माया, झपाटलेला, अशी असावी सासू, माहेरची साडी, आली लहर केला कहर, पछाडलेला, जत्रा, भरत आला परत, मुंबईचा डबेवाला, श्रीमंत दामोदर पंत. अशा विविध नाटक चित्रपटातील भूमिका विजय चव्हाण यांनी गाजवल्या.

Web Title: Varad Vijay Chawan wins colors marathi best supporting actor awarad share emotional post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.