औक्षण अन् आदर! बिग बॉसमध्ये जाण्याआधी वर्षा उसगांवकरांच्या स्टाफने अशी केली त्यांची पाठवणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 03:38 PM2024-08-28T15:38:07+5:302024-08-28T15:38:41+5:30

वर्षा उसगांवकराच्या स्टाफने त्यांना बिग बॉस मराठीच्या घरात पाठवण्याआधी त्यांना ओवाळून त्यांच्याबद्दल आदर दर्शवलाय (bigg boss marathi 5

Varsha Usgaonkar staff farewell to actress before going to Bigg Boss marathi 5 | औक्षण अन् आदर! बिग बॉसमध्ये जाण्याआधी वर्षा उसगांवकरांच्या स्टाफने अशी केली त्यांची पाठवणी

औक्षण अन् आदर! बिग बॉसमध्ये जाण्याआधी वर्षा उसगांवकरांच्या स्टाफने अशी केली त्यांची पाठवणी

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये वर्षा उसगांवकर सहभागी आहेत. महाराष्ट्राची 'वंडर गर्ल' म्हणून वर्षा उसगांवकरांची ओळख आहे. वर्षा या त्यांच्या खास शैलीत बिग बॉस मराठीचा नवीन सीझन गाजवत आहेत. वर्षा यांची घरात निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर अशा स्पर्धकांसोबत भांडणं झाली. बिग बॉस मराठीच्या घरात जाण्यापूर्वीचा वर्षा उसगांवकरांचा व्हिडीओ व्हायरल झालाय. या व्हिडीओत वर्षा यांचा स्टाफ त्यांना औक्षण करताना दिसतोय. 

वर्षा यांच्या स्टाफने केलं औक्षण

वर्षा उसगांवकर यांचा व्हिडीओ व्हायरल झालाय. या व्हिडीओत तीन महिला आणि एक माणूस दिसतोय. हा सर्व वर्षा उसगांवकरांचा स्टाफ आहे. वर्षा यांना औक्षण करुन या स्टाफने त्यांची बिग बॉसच्या घरात पाठवणी केलीय. या व्हिडीओखाली कॅप्शन देण्यात आलंय की, "मी जेव्हा बिगबॅासमध्ये जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा माझ्या या स्टाफने मला भरपुर सपोर्ट केला. त्यांच्या शिवाय इंडस्ट्रीमध्ये इतकी वर्ष टिकणं, सर्व मॅनेज करणं अवघड असतं. त्यांच्यामुळे ते सहजतेने करु शकले. आणि बिगबॅासच्या घरात जाण्याआधीही त्यांनी माझी पूर्ण साथ दिली. माझे औक्षण करुन खुप प्रेमाने माझी या घरी पाठवणी केली."


वर्षा उसगांवकरांची बिग बॉसच्या घरात चर्चा

वर्षा उसगांवकरांची बिग बॉस मराठीच्या घरात चांगलीच चर्चा आहे. वर्षा उसगांवकर जेव्हा बिग बॉस मराठीमध्ये सहभागी झाल्या तेव्हा त्या बिग बॉसच्या पहिल्या स्पर्धक होत्या. वर्षा यांची पहिल्या दोन आठवड्यातच जान्हवी आणि निक्कीशी चांगलीच भांडणं झाली. वर्षा यांचा अपमान केल्याने रितेशभाऊंनीही निक्की आणि जान्हवीला चांगलीच समज दिली. काही दिवसांपूर्वी निक्की - आर्याचा जेवणावरुन वाद झाला. त्यावेळी आर्याला मिठी मारून वर्षाताईंनी दिला धीर दिला.

Web Title: Varsha Usgaonkar staff farewell to actress before going to Bigg Boss marathi 5

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.