वरूण धवनसोबत वाघा बॉर्डरवर परफॉर्म करणार 'डान्स+ ४'चे हे स्पर्धक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 20:45 IST2019-01-21T20:45:00+5:302019-01-21T20:45:00+5:30
'डान्स+ ४' स्पर्धक ‘व्ही अनबीटेबल’ यांनी वरूण धवन आणि श्रद्धा कपूर यांच्या भूमिका असलेल्या रेमो डिसुझा यांच्या आगामी चित्रपटात एक गाणे मिळवले असून त्या गाण्यावर ते थिरकताना दिसणार आहेत.

वरूण धवनसोबत वाघा बॉर्डरवर परफॉर्म करणार 'डान्स+ ४'चे हे स्पर्धक
आपल्या अफलातून डान्सिंगसह प्रेक्षकांना थक्क केल्यानंतर 'डान्स+ ४' स्पर्धक ‘व्ही अनबीटेबल’ यांनी वरूण धवन आणि श्रद्धा कपूर यांच्या भूमिका असलेल्या रेमो डिसुझा यांच्या आगामी चित्रपटात एक गाणे मिळवले आहे. ‘व्ही अनबीटेबल’ हा मुंबईचा ३५ सदस्यांचा क्रू असून त्यांना ऑडिशन्सपासूनच त्यांच्या गुरूत्वाकर्षणाला मात देण्याच्या त्यांच्या ॲक्ट्ससाठी टाळ्या मिळत असून त्यांनी सुपर जज रेमो डिसुझा यांच्या चित्रपटात एक गाणे मिळवले आहे.
सुपर जज रेमो डिसुझा ‘व्ही अनबीटेबल’मुळे अगदी प्रभावित झाले होते. ह्या चित्रपटाचे पहिले शेड्युल जानेवारी महिन्यात अमृतसर येथे सुरू होणार आहे. रेमो यांनी ‘व्ही अनबीटेबल’ना वरूण धवनसोबत परफॉर्म करण्यासाठी वाघा बॉर्डरला नेले आहे. तिथे मुख्य डान्स सीक्वेन्स चित्रीत होणार असून ‘व्ही अनबीटेबल’ त्याची तयारी आणि त्याचसोबत डान्स+ साठीही सराव करत आहेत.
वरूण धवनही ह्या डान्स सीक्वेन्ससाठी सज्ज असून त्याने आधीच सरावाला सुरूवात केली आहे. सूत्रांनुसार, “वरूण धवन आणि व्ही अनबीटेबल वाघा बॉर्डर येथे लाईव्ह प्रेक्षकांसमोर परफॉर्म करणार आहेत.” अखेर ‘व्ही अनबीटेबल’च्या गुणांची आणि परिश्रमांची कदर झालीच! 'डान्स+ ४' दर शनिवार व रविवार रात्री ८ वाजता फक्त स्टार प्लसवर पाहायला मिळेल.