Bigg Boss 12 : Exclusive : वरूण धवनची होणार ‘बिग बॉस’च्या घरात एंट्री; रंगणार रॅप!
By अबोली कुलकर्णी | Updated: September 22, 2018 13:33 IST2018-09-22T13:32:04+5:302018-09-22T13:33:04+5:30
अनेक किस्से, मैत्री, वाद-विवाद यांच्यामुळे एपिसोड्सची सर्वत्र चर्चा सुरू झालीय. आता मात्र, बिग बॉसच्या चाहत्यांसाठी आमच्याकडे एक बातमी आहे. ती म्हणजे बिग बॉसच्या घरात अभिनेता वरूण धवन एंट्री घेणार आहे. ‘सुई धागा’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो घरात येणार आहे.

Bigg Boss 12 : Exclusive : वरूण धवनची होणार ‘बिग बॉस’च्या घरात एंट्री; रंगणार रॅप!
प्रसिद्ध हिंदी रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’चे १२वे सीझन सुरू झाले अन् सलमान खानच्या चाहत्यांमध्ये जणुकाही उत्साहच संचारला. या सीझनचे वैशिष्ट्य विचित्र जोड्या हे असून वेगवेगळया टास्कसह प्रत्येक दिवसाचा एपिसोड हा रंगताना दिसतो आहे. अनेक किस्से, मैत्री, वाद-विवाद यांच्यामुळे एपिसोड्सची सर्वत्र चर्चा सुरू झालीय. आता मात्र, बिग बॉसच्या चाहत्यांसाठी आमच्याकडे एक बातमी आहे. ती म्हणजे बिग बॉसच्या घरात अभिनेता वरूण धवन एंट्री घेणार आहे. ‘सुई धागा’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो घरात येणार आहे.
वरूण धवन बिग बॉसच्या घरात येऊन काय करणार ? असा प्रश्न साहजिकच तुम्हाला पडला असेल. तर आम्ही सांगतो की, वरूण धवन घरात आल्यानंतर सलमान खानसोबत एक रॅप सादर करणार आहे. बिग बॉसचा बँड असलेल्या ‘बिग बँड’वर हे दोघे धम्माल परफॉर्मन्स करणार आहेत. हे दोघे एकत्र आल्यानंतर किती धम्माल मजा येईल ? याचा अंदाज तुम्हाला नक्कीच आला असेल. त्यानंतर वरूण धवन हा सलमानला एक विनंती करणार आहे. ती म्हणजे सुई-धाग्याच्या साह्याने तो आपले नाव ‘एसके’ असे लिहीणार आहे. वरूण धवनला सर्व स्पर्धक जोड्यांसोबत संवाद साधण्याचा योग येणार आहे.
लोकप्रिय हिंदी रिअॅलिटी शो 'बिग बॉस'च्या बाराव्या सीझन वेगवेगळया कारणांनी गाजतो आहे. यात भजनसम्राट अनुप जलोटा व जसलिन मथारूच्या रिलेशनशीपच्या उलगड्याने प्रचंड गाजला. यावरून सोशल मीडियावर त्यांना खूप ट्रोलही करण्यात आले. आता तर बिग बॉसच्या घरात अनूप जलोटा यांचे सुर बदलताना दिसत आहेत. चक्क सनी लिओनच्या 'बेबी डॉल' या गाण्यावर त्यांनी ठेका धरला. मागच्या भागात स्पर्धकांना 'राजा-राणी' हा टास्क देण्यात आला. या टास्कमध्ये अनूप जलोटा यांचा हटके अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.