दिव्या अग्रवालशी ब्रेकअप झाल्यानंतर वरुण सूदच्या आयुष्यात आलं नवं प्रेम, आता या अभिनेत्रीला करतोय डेट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 03:55 PM2023-07-11T15:55:01+5:302023-07-11T15:57:41+5:30
दिव्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर वरुणही पुन्हा प्रेमात पडला आहे.
टीव्हीवरील सर्वात क्युट कपल दिव्या अग्रवाल आणि वरुण सूद अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. मात्र, 2022 मध्ये दिव्या अग्रवालने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे ब्रेकअपची घोषणा केली होती. दोघांना अनेकदा ब्रेकअपचे कारण विचारण्यात आले, पण याविषयी दोघांनीही मौन बाळगलं.
वरुणपासून वेगळे झाल्यानंतर काही महिन्यांतच अभिनेत्रीने तिच्या नव्या नात्याचा खुलासा केला. दिव्याने बिझनेसमन अपूर्व पाडगावकरशी साखरपुडा केला. तर वरुणच्या आयुष्यातही नवं प्रेम आल्याची चर्चा आहे. दिव्यासोबतच्या ब्रेकअपच्या वर्षभरानंतर वरुणही पुन्हा प्रेमात पडला आहे. रिपोर्टनुसार, वरुण आता नितिभा कौलसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. या कपलने एक क्यूट रील शेअर करत त्यांचं नातं अधिकृत केले आहे. तुम क्या मिले या गाण्यावर दोघांनी रील शेअर केली आहे. यामध्ये दोघे तुम क्या मिले या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.
आता या व्हिडिओवर वरुणचे चाहते त्याचे अभिनंदन करत आहेत. एका यूजरने लिहिले, शुभेच्छा. तुमच्या दोघांची जोडी सुंदर आहे. कोणाच्याही नजरे नको लागू दे. दुसऱ्याने लिहिले की, मी या जोडप्यासाठी प्रार्थना करत आहे.
नितिभा कौल एक YouTuber आणि अभिनेत्री आहे. ती 'बिग बॉस 10' चा हिस्सा होती आणि काही म्युझिक व्हिडिओंमध्येही ती दिसली होती. नितिभा तेव्हा गुगल इंडियामध्ये काम करत होत्या. 'बिग बॉस'मधून मिळालेल्या लोकप्रियतेमुळे ती स्टार झाली आहे. नितीभा कौल माजी मिस इंडिया दिल्ली फायनलिस्ट राहिली आहे. ती TEDx स्पीकर आहे. एमटीव्हीवरील शोचे सूत्रसंचालनही केले आहे. इंस्टाग्रामवर तिचे जवळपास 1 मिलियन फॉलोअर्स आहेत.