'छोट्या बयोची मोठी स्वप्नं' मालिकेत वीणा जामकरचे कमबॅक, दिसणार भारतीच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 02:20 PM2024-06-20T14:20:23+5:302024-06-20T14:21:00+5:30

Veena Jamkar : अभिनेत्री वीणा जामकर 'छोट्या बयोची मोठी स्वप्नं' मालिकेत पुन्हा पाहायला मिळणार आहे. तिच्या परत येण्याने मालिकेत आगळीवेगळी रंगत पाहायला मिळेल.

Veena Jamkar's comeback in 'Chhotya Biochi Bighi Swapnam' series, will be seen in the role of Bharti | 'छोट्या बयोची मोठी स्वप्नं' मालिकेत वीणा जामकरचे कमबॅक, दिसणार भारतीच्या भूमिकेत

'छोट्या बयोची मोठी स्वप्नं' मालिकेत वीणा जामकरचे कमबॅक, दिसणार भारतीच्या भूमिकेत

बयोच्या स्वप्नपूर्तीचा प्रवास रेखाटणारी 'छोट्या बयोची मोठी स्वप्नं' (Chhotya Bayochi Mothi Swapana) ही सोनी मराठीवरील लोकप्रिय मालिका प्रेक्षकांनी चांगलीच उचलून धरली आहे. शिक्षणाच्या ध्यासाने कोकण ते मुंबई असा खडतर प्रवास करणारी बयो आता डॉक्टर होण्याच्या प्रवासात पुढची वाटचाल करते आहे. तिला आजवर वडिलांचा पाठिंबा आणि डॉ. विशालची साथ  मिळाली. आजवरच्या सगळ्या अडचणींना सामोरं जात बयोचा डॉक्टर होण्याचा प्रवास सुरू आहे.

वडिलांसोबत ती गरजू रुग्णांची सेवा घरच्या घरी करू लागली, पण यात कमतरता राहिली ती तिच्या आईच्या सोबतीची, म्हणजेच भारतीची. पण मालिकेत आता भारतीचा पुन्हा प्रवेश होणार आहे. प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री वीणा जामकर आता आपल्याला भारती या भूमिकेतून पुन्हा पाहायला मिळणार आहे.


अभिनेत्री वीणा जामकर मालिकेत पुन्हा पाहायला मिळणार आहे. तिच्या परत येण्याने मालिकेत आगळीवेगळी रंगत पाहायला मिळेल. बयो आणि भारती पुन्हा एकत्र पाहायला मिळतील. भारतीचं परत येणं, बयोला आवश्यक असा तिचा पाठिंबा मिळणं; हे तिच्या डॉक्टर होण्याच्या स्वप्नपूर्तीसाठी आवश्यक होतं. मालिकेत ती कशा प्रकारे येणार आणि बयो आणि तिची भेट कशी होणार, हे पाहणं उत्सुकतेचं असेल. 
भारती तिच्या स्वप्नांना समजून घेऊ शकेल का..? तिच्या येण्यानं बयोला कशी मदत मिळेल, हे आता आपल्याला मालिकेत पाहायला मिळेल आणि हे समजून घेण्यासाठी आपल्याला मालिका पाहावी लागेल.

Web Title: Veena Jamkar's comeback in 'Chhotya Biochi Bighi Swapnam' series, will be seen in the role of Bharti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.