जय बजरंगबली! 'वीर हनुमान'मधून उलगडणार शौर्य गाथा; 'या' तारखेपासून येणार प्रेक्षकांच्या भेटीला
By सुजित शिर्के | Updated: March 6, 2025 14:06 IST2025-03-06T13:58:05+5:302025-03-06T14:06:14+5:30
'सोनी सब'वर लवकरच नवीन पौराणिक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, जाणून घ्या.

जय बजरंगबली! 'वीर हनुमान'मधून उलगडणार शौर्य गाथा; 'या' तारखेपासून येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Veer Hanuman: स्वस्तिक प्रोडक्शन निर्मित 'वीर हनुमान' ही बहुप्रतीक्षित पौराणिक मालिका येत्या काही दिवसांत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोनी सब वाहिनीवर लवकरच ही मालिका प्रसारित केली जाणार आहे. रामभक्त हनुमानाचा जन्म, बालपण तसेच माता अंजनीसोबतचं त्यांच नातं मालिकेतून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
दरम्यान, सर्वश्रेष्ठ रामभक्त हनुमानाच्या रामभक्तीचा महिमा वर्णावा तितका कमीच. भगवान हनुमंताची जन्मकथा या मालिकेतून उलगडणार आहे. या मालिकेत बाल हनुमानाच्या भूमिकेत आन तिवारीसोबत माता अंजनीच्या भूमिकेत सायली साळुंखे, केसरीच्या रूपात आरव चौधरी आणि वाली व सुग्रीव यांच्या दुहेरी भूमिकेत माहिर पांधी दिसणार आहे. हनुमानाची कथा आजही लक्षावधी लोकांसाठी मार्गदर्शक शक्ती म्हणून कार्य करते. 'वीर हनुमान'मध्ये हनुमान कथा ही धैर्य, निःस्वार्थतेची आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाची कहाणी आहे.
येत्या ११ मार्चपासून ही मालिका सोनी सब वाहिनीवर सोमवार ते शनिवार रात्री ७: ३० वाजता प्रसारित केली जाणार आहे. रामभक्त हनुमानाची ही गोष्ट मालिकेतून पाहायला मिळणं म्हणजे प्रेक्षकांसाठी एक सुखद अनुभव नक्कीच असेल.
'वीर हनुमान'मध्ये बाल हनुमानाची भूमिका साकारणारा आन तिवारी याच्याबद्दल सांगायचं झाल तर, त्याने अनेक मालिका वेबसीरिजमध्ये काम केलं आहे. 'बाल शिव' या हिंदी मालिकेतून त्याने इंडस्ट्रीत पदार्पण केलं. शिवाय लवकरच तो एक नव्या वेबसीरिजमध्ये झळकण्याची शक्यता आहे.