'...फार अस्वस्थ होतं'; 'आई कुठे काय करते'मधील अरुंधतीची 'ती' पोस्ट चर्चेत!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2022 01:47 PM2022-04-23T13:47:33+5:302022-04-23T13:48:08+5:30

Aai Kuthe Kay Karte:अरुंधतीची भूमिका अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) हिने साकारली आहे. दरम्यान मधुराणीची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आली आहे.

'... very uncomfortable'; Aai Kuthe Kay Karte Fame Arundhati Aka Madhurani Prabhulkar's post goes viral | '...फार अस्वस्थ होतं'; 'आई कुठे काय करते'मधील अरुंधतीची 'ती' पोस्ट चर्चेत!

'...फार अस्वस्थ होतं'; 'आई कुठे काय करते'मधील अरुंधतीची 'ती' पोस्ट चर्चेत!

googlenewsNext

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte)ने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. सध्या मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. या मालिकेतील आई म्हणजेच अरुंधतीने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. अरुंधतीची भूमिका अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) हिने साकारली आहे.  दरम्यान मधुराणीची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आली आहे.

अरुंधती म्हणजेच मधुराणी प्रभुलकर हिने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती सेटवर पुस्तक वाचताना दिसते आहे. तिने फोटो शेअर करून लिहिले की,मिळेल ती जागा आणि मिळेल तितक्या क्षणांची फुरसत चिमटीत पकडायची आणि जमेल तितकं वाचायचं , भले एक पुस्तक वाचायला महिना लागो पण ते पुरं करायचं....वाचलं नाही काही चांगलं तर फार अस्वस्थ होतं. 


तिने पुढे लिहिले की, मी एक शक्कल लढवलेय. सेटवर एक , मी सकाळचा चहा प्यायला बसते तिथे एक आणि बेडवर एक अशी तीन पुस्तक ठेवलेली असतात ... तिन्ही वेगवेगळ्या प्रकारची.... जमेल तसं...दोन पानं कधी चार . पण वाचायचं...वाचत राहायचं. जागतिक ग्रंथ दिनाच्या सर्वांना शुभेच्छा.सध्या मी वाचत असलेली पुस्तकं १. मंद्र . भैरप्पा, २. सूर्य गिळणारी मी . अरुणा सबाने, ३. जग बदलणारे ग्रंथ . दीपा देशमुख. तुम्ही काय वाचताय???
मधुराणी प्रभुलकर हिच्या पोस्टवर चाहते कोणते पुस्तक वाचत आहेत, हे कमेंटमध्ये सांगत आहेत. त्यावर मधुराणीने कमेंट बॉक्समध्ये लिहिले की, वाह सगळे वाचतायत हे वाचून आंनद झाला.

Web Title: '... very uncomfortable'; Aai Kuthe Kay Karte Fame Arundhati Aka Madhurani Prabhulkar's post goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.