ज्येष्ठ अभिनेते तेज सप्रू बनले गायक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2017 11:01 AM2017-02-02T11:01:55+5:302017-02-02T16:31:55+5:30
तेज सप्रू यांनी आतापर्यंत कबूल है, सात फेरे, यहाँ में घर घर खेली यासांरख्या अनेक मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या ...
त ज सप्रू यांनी आतापर्यंत कबूल है, सात फेरे, यहाँ में घर घर खेली यासांरख्या अनेक मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. आता ते दिल से दिल तक या मालिकेत झळकणार आहेत. या मालिकेत त्यांचे एक वेगळे रूप प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
दिल से दिल तक ही मालिका लवकरच सुरू होणार असून या मालिकेत प्रेक्षकांना पार्थ आणि शर्वरीची प्रेमकथा पाहायला मिळणार आहेत. या मालिकेत पार्थची भूमिका सिद्धार्थ शुक्ला तर शर्वरीची भूमिका रश्मी देसाई साकारणार आहे. तसेच या मालिकेत जास्मिन भसिनदेखील प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. सलमान खान, प्रिती झिंटा आणि राणी मुखर्जी यांच्या चोरी चोरी चुपके चुपके या चित्रपटावर आधारित दिल से दिल तक ही मालिका असून ही मालिका सरोगसीवर भाष्य करणार आहे. दिया और बाती या प्रसिद्ध मालिकेची निर्मिती केलेल्या शशी सुमीत मित्तल प्रोडक्शनची ही मालिका आहे.
दिल से दिल तक या मालिकेत ज्येष्ठ अभिनेते तेज सप्रू पार्थच्या आजोबांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहेत. या मालिकेत ते पुरुषोत्तम ही व्यक्तिरेखा साकरणार असून घरातील प्रमुखाची व्यक्तिरेखा ते साकारणार आहेत. या मालिकेतील एका गाण्यासाठी ते आपला आवाज देणार आहेत. ते एक लोकगीत असून घरात गोकुळाष्टमी साजरी करत असताना हे गाणे दाखवले जाणार आहे. त्यांच्या या गाण्यातून प्रेक्षकांना मालिकेतील भानुशाली या कुटुंबाची ओळख करून दिली जाणार आहे. भानुशाली हे कुटुंब पारंपरिक चालीरिती मानणारे आहे असे मालिकेत दाखवले जाणार आहे.