'तेरा यार हूं मैं'मध्ये दलजीतची आई म्हणून विभा चिब्बरच्या प्रवेशामुळे मालिका खास वळणावर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 07:58 PM2021-05-05T19:58:41+5:302021-05-05T20:02:10+5:30
मालिकेमध्ये गुरमीत लंडनवरून भारतामध्ये परतताना दिसण्यात येईल आणि ती दीर्घकाळानंतर तिच्या मुलीला भेटणार आहे.
सोनी सबवरील लोकप्रिय मालिका 'तेरा यार हूं मैं' या आठवड्यामध्ये एपिसोड्सच्या रंजक वळणावर आली. आगामी एपिसोड्समध्ये प्रेक्षकांना दलजीत (सयंतनी घोष) व राजीव (सुदीप साहिर) यांच्या जीवनाला मोठी कलाटणी मिळताना पाहायला मिळणार आहे.
दलजीतची आई गुरमीत (विभा चिब्बर) मालिकेमध्ये प्रवेश करताना पाहायला मिळणार आहे. मालिकेमध्ये गुरमीतच्या प्रवेशासह चाहते व प्रेक्षकांनी अनोखे मनोरंजन पाहण्यास सज्ज राहा, कारण मालिका त्यांना भावनांच्या रोलरकोस्टर राइडवर घेऊन जाणार आहे.
पटकथेला रोमाचंक वळण मिळते, जेथे प्रेक्षकांना राजीव त्याच्या अपहरणाच्या घटनेमधून परत येताना पाहायला मिळणार आहे. शक्ती दलजीतला ब्लॅकमेल करत असतो आणि तो तिच्याकडून तिची मालमत्ता त्याच्या नावे करून घेत तिला कायमचे बंसल सदनमधून बाहेर काढणार असतो, तितक्यातच राजीव तेथे येतो. ही स्थिती सुरळीत होत असतानाच दलजीतची आई तिला कॉल करते. दलजीतची आई आजारी असल्यामुळे तिला व तिच्या नवीन कुटुंबाला भेटण्यासाठी येण्यास सांगते आणि ती तिच्या नवीन कुटुंबाला भेटलेली देखील नसते.
दलजीतची आई गुरमीत ही दलजीतप्रमाणेच उत्साही व जीवनाचा पुरेपूर आनंद घेणारी महिला आहे. ती नुकतेच लंडनमधून परतली आहे. ती अनेक प्रॉपर्टीजची मालक असते आणि या प्रॉपर्टीजमध्ये एका रिसॉर्टचा देखील समावेश आहे. तिचा आजार हे फक्त एक कारण आहे, गुरमीत दलजीतला भावनिक करून सोडणार आहे.
मालिकेमध्ये गुरमीतच्या भूमिकेत प्रवेश करताना दिसण्यात येणा-या विभा चिब्बर म्हणाल्या, ''गुरमीत ही जीवनाचा पुरेपूर आनंद घेणारी उत्साहवर्धक पंजाबी आई आहे. भूमिका आणि माझ्यामध्ये बरेच साम्य आहे. मालिकेमध्ये गुरमीत लंडनवरून भारतामध्ये परतताना दिसण्यात येईल आणि ती दीर्घकाळानंतर तिच्या मुलीला भेटणार आहे. या सीन्ससाठी शूटिंग करताना मला भावना व ड्रामाच्या रोलर कोस्टरदरम्यान योग्य संतुलन राखण्याची संधी मिळाली. मला खात्री आहे की, प्रेक्षकांना आगामी एपिसोड्स खूप आवडतील.''