"त्याने आमच्या विरोधात जाऊन अंकिताशी लग्न केलं" विकी जैनच्या आईचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 08:50 AM2024-01-10T08:50:00+5:302024-01-10T08:51:37+5:30
विकीच्या आईने अंकिताला दिला सल्ला
टीव्हीवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) मध्ये सध्या अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) यांचा ड्रामा सुरु आहे. आता घरातील सदस्यांचे कुटुंबीय शोमध्ये येणार आहेत. चॅनलने रिलीज केलेल्या प्रोमोमध्ये अंकिता आणि विकी यांच्या आई देखील आलेल्या दिसत आहेत. दरम्यान विकी जैनच्या आईने मोठा खुलासा केला आहे. विकीने कुटुंबाच्या विरोधात जाऊन अंकिताशी लग्न केले होते. आमचा त्याला पाठिंबा नव्हता असं ती एका मुलाखतीत म्हणाली.
विकी जैनची आई रंजना जैन पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली,"बघा अंकिताशी लग्न विकीने त्याच्या मर्जीनुसार केले आहे. त्याला आमचा विरोध होता. आता तो लग्न निभावत आहे. याच्याशी आमचं काहीच देणंघेणं नाही. सगळे बघत आहेत त्यांच्यात काय चाललंय पण आम्ही त्याला काहीच बोलत नाही आहोत. तो बाहेर येईल तेव्हा नात्यात सुधारणा आणेल. त्यानेच खराब केलं आहे आणि मला विश्वास आहे की तोच सगळं नीट करेल. तो असाच मुलगा आहे."
तुझा पती खरंच परमेश्वर आहे
अंकिताने विकीवर ज्याप्रकारे हात उचलला त्यावर रंजना जैन म्हणाल्या,"हे अजिबातच बरोबर नाही. आपण भारतात राहतो आणि इथे पतीला परमेश्वर समजलं जातं. अंकिता तुझा पती तर खरोखरंच परमेश्वर आहे आणि तू त्याला मारत आहेस?"
14 डिसेंबर 2021 रोजी विकी जैन आणि अंकिता लोखंडेने सातफेरे घेतले. भव्य असा त्यांचा लग्नसोहळा पार पडला. विकी जैन मोठा बिझनेसमन आहे. सुशांतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अंकिता लोखंडे एकटी पडली होती. विकी हा अंकिताचा आधीपासूनच मित्र होता. नंतर त्यांच्यात पुन्हा बोलणं वाढलं आणि दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. सध्या दोघंही बिग बॉसमध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत.