अंकिता लोखंडेमुळे विकी जैनला लागली लॉटरी, 'बिग बॉस १७'मधून प्रसिद्धीच मिळाली नाही तर झाला मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 02:28 PM2024-01-25T14:28:31+5:302024-01-25T14:28:54+5:30

Ankita Lokhande And Vicky Jain : बिग बॉस १७ सीझन अंतिम टप्प्यात आला असून लवकरच शोचा विजेता मिळणार आहे. शोचा फिनाले २८ जानेवारीला होणार आहे.

Vicky Jain got lottery due to Ankita Lokhande, not only did she get fame from 'Bigg Boss 17' but she got wealth. | अंकिता लोखंडेमुळे विकी जैनला लागली लॉटरी, 'बिग बॉस १७'मधून प्रसिद्धीच मिळाली नाही तर झाला मालामाल

अंकिता लोखंडेमुळे विकी जैनला लागली लॉटरी, 'बिग बॉस १७'मधून प्रसिद्धीच मिळाली नाही तर झाला मालामाल

बिग बॉस १७ (Bigg Boss 17) सीझन अंतिम टप्प्यात आला असून लवकरच शोचा विजेता मिळणार आहे. शोचा फिनाले २८ जानेवारीला होणार आहे. अंकिता लोखंडेसोबत तिचा पती विकी जैनही या शोमध्ये सहभागी झाला होता. या शोमध्ये विकीने अंकिताचा नवरा बनून नव्हे तर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याने शोमध्ये बरेच खेळ खेळला आणि शेवटपर्यंत खेळला. विकी अंतिम फेरीत आपले स्थान निर्माण करू शकला नाही पण तो संपूर्ण सीझनमध्ये चर्चेत राहिला. मग ते मुनव्वर फारुकीसोबतच्या भांडणाबद्दल असो किंवा अंकितासोबतच्या घटस्फोटाबद्दल असो. आता मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर विकीने या शोमधून चांगलीच कमाई केली आहे.

जेव्हा विकी जैनने शोमध्ये प्रवेश केला तेव्हा लोकांना वाटले की तो अंकिताचा नवरा बनून संपूर्ण गेम खेळेल. पण जसजसे दिवस सरत गेले तसतसे विकी स्वतःचा खेळ खेळू लागला. आता विकी घराबाहेर पडला असून या शोमधून त्याला प्रसिद्धीसोबतच पैसाही मिळाला आहे.

विकी जैनने कमावले इतके पैसे 
Siasat.com च्या रिपोर्टनुसार, विक्की जैन एका एपिसोडसाठी ७१,००० रुपये घेत होता. त्यानुसार तो दर आठवड्याला सुमारे ५ लाख रुपये घेत होता. विकी गेल्या आठवड्यापर्यंत शोमध्ये राहिला. हिशोब केला तर त्याने या सीझनमध्ये ७० लाख रुपये कमावले आहेत. विकी जैन बिग बॉस १७चा सर्वात वादग्रस्त स्पर्धक आहे. शोमधील इतर स्पर्धकांशी ज्या पद्धतीने तो बोलला त्यामुळे त्याला अनेकदा ट्रोलिंगला सामोरे जावे लागले.

शो बाहेर येताच केले सेलिब्रेशन
विकी जेव्हा शोमधून बाहेर पडला तेव्हा अंकिता लोखंडेने त्याला एकट्याने पार्टी करू नकोस असे सांगितले होते. मी आल्यावर एकत्र पार्टी करू. पण तसे झाले नाही आणि शोनंतर विकी आयशा खानसोबत पार्टी करताना दिसला. विकीच्या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

Web Title: Vicky Jain got lottery due to Ankita Lokhande, not only did she get fame from 'Bigg Boss 17' but she got wealth.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.