'या' स्पर्धकासाठी विकी जैनने पत्नी अंकिता लोखंडेला दिला धोका; संपूर्ण सीझनसाठी केलं नॉमिनेट ?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 12:42 PM2023-12-06T12:42:32+5:302023-12-06T12:44:01+5:30
"बिग बॉस 17' च्या घरात अंकिता लोखंडे ही पती विकी जैनसोबत सहभागी झालेली आहे.
'बिग बॉस 17' दिवसेंदिवस अधिकच मनोरंजक होत चालले आहे. 'बिग बॉस 17' या शोमध्ये एकामागून एक ट्विस्ट येत आहेत. शोच्या आगामी एपिसोडमध्ये आत्तापर्यंतचा सर्वात मोठा ट्विस्ट येणार आहे, ज्याची झलक प्रोमोमध्ये पाहायला मिळाली आहे. बिग बॉसच्या फॅन पेज 'द खबरी'ने शोचा लेटेस्ट प्रोमो शेअर केला आहे.
नव्या प्रोमोमध्ये बिग बॉसने तिन्ही 'दिल दिमाग आणि दम' ही तिन्ही घरे एका ट्विस्टने पुन्हा उघडण्याचा निर्णय घेतल्याचे पाहायला मिळते. मात्र, ही घरे मिळवण्यासाठी अंकिता आणि विकीला मोठी किंमत मोजावी लागणार आहे. 'दिल' हे घर मिळवण्यासाठी संपुर्ण सिझन विकीला नॉमिनेट करण्याचा पर्याय बिग बॉस अंकिताला देत असल्याचे प्रोमोमध्ये दिसते. मात्र, यावर उत्तर देताना अंकिता म्हणते, 'नाही, मी हे करणार नाही'.
Promo #BiggBoss#AnkitaLokhande aur #VickyJain ko mila ek dusre ko nominate karne ka mauka pic.twitter.com/FeiRFSkrp5
— The Khabri (@TheKhabriTweets) December 5, 2023
तर असाच पर्याय बिग बॉस विकी जैनलाही देतात. प्रोमोमध्ये, बिग बॉस विकीला विचारतात की, यापुर्वी तु नीलला संपुर्ण सिझनसाठी नॉमिनेट केले होते. आता तुला हवे ते घर मिळवण्यासाठी अंकिताला संपूर्ण सीझनसाठी नॉमिनेट करावे लागेल. प्रोमोमध्ये दिसते की, बिग बॉस कुटुंबातील सर्व सदस्यांसमोर विकी जैनचा निर्णय जाहीर करतात. यानंतर विकी आणि अंकितामध्ये वाद पाहायला मिळतो. पण, विकी कोणता निर्णय घेतो, हे प्रोमोमध्ये दिसत नाही. त्यामुळे विकीने अंकिताला संपूर्ण सीझनसाठी नॉमिनेट केले की नाही, हे एपिसोडमध्ये समोर येईल.
बिग बॉस 17 च्या घरात अंकिता लोखंडे ही पती विकी जैन याच्यासोबत सहभागी झालेली आहे. दोघांमध्ये अनेकदा कडाक्याचे भांडण पाहायला मिळाले आहे. अंकिता टीव्हीवरील प्रसिद्ध चेहरा आहे. तिने आतापर्यंतच्या करिअरमध्ये मालिकांसोबतच काही चित्रपटामध्येही महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. दरम्यान, ‘बिग बॉस’च्या या पर्वात अनेक नवीन गोष्टी पाहायला मिळतील. प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी यंदा बरेच ट्विस्ट ठेवण्यात आले आहे. घर तीन विभागांमध्ये विभागले गेले आहे आणि ते ‘दिल, दिमाग आणि दम’ थीमवर आधारित आहे.