Bigg boss 17: 'माझ्या नवऱ्याने मला विकलं'; विकी जैनविषयी अंकिताचं धक्कादायक वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 11:52 AM2023-10-16T11:52:13+5:302023-10-16T11:52:44+5:30
Ankita lokhande: बिग बॉसचा शो सुरु होताच अंकिताने केलेल्या वक्तव्यामुळे ती चर्चेत आली.
छोट्या पडद्यावर तुफान लोकप्रिय असलेल्या बिग बॉस या रिअॅलिटी शोचं १७ (bigg boss 17) वं पर्व नुकतंच सुरु झालं आहे. काल (१५ ऑक्टोबर) या शोचा मोठा दिमाखदार पद्धतीने प्रिमियर सोहळा रंगला. यावेळी अभिनेत्री अंकिता लोखंडे (ankita lokhande) आणि तिचा पती उद्योजक विकी जैन (vicky jain) या जोडीने यंदाच्या पर्वात सहभाग घेतला आहे. विशेष म्हणजे हा सुरु झाल्यानंतर काही तासांमध्येच अंकिताने तिच्या नवऱ्याविषयी धक्कादायक वक्तव्य केलं. तिच्या या वक्तव्यामुळे शोच्या सुरुवातीलाच ही जोडी चर्चेत आली.
अंकिता लोखंडे आणि विकी जैन ही जोडी इंडस्ट्रीतील पॉवर कपल म्हणून ओळखले जातात. विशेष म्हणजे बिग बॉस १७ च्या माध्यमातून या जोडीविषयी अनेक गोष्टी चाहत्यांना कळणार आहेत. बिग बॉसच्या घरात एन्ट्री केल्यानंतर अंकिताने पतीने मला विकलं.. असं धक्कादायक विधान केलं. ज्यामुळे आता चर्चेला उधाण आलं आहे.
प्रिमियर सोहळ्यामध्ये सलमान खानने अंकिताला 'गेल्या अनेक वर्षांपासून तुला शो ऑफर होत आहे', असं विचारलं. त्यावर, "माझ्या नवऱ्याने मला विकलं आहे," असं अंकिता म्हणाली. त्यावर 'विकीला या शोमध्ये यायचं होतं..?' असं सलमानने विचारलं. त्यावर 'त्याच्याच मुळे मी या शोमध्ये यायला होकार दिला', असं अंकिताने सांगितलं.
दरम्यान, बिग बॉस १७ मध्ये अंकिता-विकीसोबत अनेक फेमस सेलिब्रिटी सहभागी झाले आहेत. यात निल-ऐश्वर्या ही जोडी सुद्धा सहभागी झाली आहे. अंकिताने पवित्र रिश्ता या मालिकेतून तुफान लोकप्रियता मिळवली. त्यानंतर ती कंगना रणौतच्या मणिकर्णिका या सिनेमातही झळकली होती.