'आतापर्यंत बिग बॉसमध्ये लग्न झाली पण यंदा घटस्फोट होणार'; सततच्या भांडणामुळे विकी-अंकिता ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 05:21 PM2023-12-15T17:21:03+5:302023-12-15T17:21:32+5:30

Ankita lokhande: बिग बॉसमध्ये अंकिता-विकी सहभागी झाल्यापासून ते सातत्याने एकमेकांसोबत भांडण करत आहेत.

vicky-jain-trolled-for-insulting-wife-ankita-lokhande-on-national-tv-bigg-boss-over-small-things-users-call-his-behaviour-disgusting | 'आतापर्यंत बिग बॉसमध्ये लग्न झाली पण यंदा घटस्फोट होणार'; सततच्या भांडणामुळे विकी-अंकिता ट्रोल

'आतापर्यंत बिग बॉसमध्ये लग्न झाली पण यंदा घटस्फोट होणार'; सततच्या भांडणामुळे विकी-अंकिता ट्रोल

छोट्या पडद्यावर सध्या बिग बॉसचं १७ वं (bigg boss 17) पर्व चांगलंच गाजताना दिसत आहे. या पर्वात स्पर्धकांना देण्यात येणाऱ्या टास्कपेक्षा घरातील सदस्यच जास्त चर्चेत येत आहेत. यामध्येच अभिनेत्री अंकिता लोखंडे  (ankita lokhande) आणि विकी जैन (vicky jain) ही जोडी तर प्रेक्षकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू झाली आहे. दिवसेंदिवस या जोडीतील वादविवाद वाढत आहेत. विशेष म्हणजे त्यांचे वाद इतके विकोपाला गेलेत की ही जोडी लवकरच विभक्त होणार की काय अशी शंका नेटकरी उपस्थित करु लागले आहेत.

बिग बॉसच्या घरात ही जोडी सहभागी झाल्यापासून विकी, अंकिताचा पाणउतारा करायची एकही संधी सोडत नाहीये. तो सतत या ना त्या कारणामुळे अंकिताला त्रास द्यायचा प्रयत्न करतो. विशेष म्हणजे त्याचं हे वागणं पाहून सलमान खान आणि एकता कपूर यांनीही त्याला त्याच्या वागण्यात सुधारणा करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, तरी सुद्धा त्याच्या वागण्यात काहीही बदल झाला नाही. त्यामुळेच आता या दोघांच्या नात्यात दिवसेंदिवस फूट पडत चालल्याचं दिसून येत आहे.

विकी या शोमध्ये सहभागी झाल्यापासून घरातील प्रत्येक व्यक्तीसोबत चांगलं बॉण्डिंग शेअर करत आहे. मात्र, दुसरीकडे तो अंकिताला कायम कमीपणा दाखवायचा प्रयत्न करतो. अलिकडेच या जोडीचं जेवणावरुन भांडण झालं. अंकितापेक्षा खानजादी उत्तम स्वयंपाक करते असं विकीने म्हटलं. इतकंच नाही तर , लग्नाच्या ३ वर्षात अंकिताने माझ्यासाठी कधीच कोणता पदार्थ केला नाही, असंही तो म्हणाला. त्याच्या या वाक्यामुळे अंकिता प्रचंड दुखावली गेली आणि तिला रडू कोसळलं.

दरम्यान, अंकिताने कधीही विकीशी बोलायचा प्रयत्न केला की तो तिला झिडकारतो. त्यामुळे विकीचं हे वागणं पाहून नेटकरी चांगलेच संतापले आहेत. इतकंच नाही तर त्यांचं नातं फार काळ टिकणार नाही असंही त्यांनी म्हटलं. 

काय म्हणाले नेटकरी?

'आतापर्यंत बिग बॉसच्या घरात लग्न झाल्याचं पाहिलं होतं पण यंदाच्या पर्वात घटस्फोट होणार', असं एका युजरने म्हटलं आहे. तर, 'विकी अंकितासोबत इतकं वाईट का वागतो?' , 'हिने चुकीच्या माणसाची निवड केली', असं म्हणत कितीतरी कमेंट नेटकरी करत आहेत.
 

Web Title: vicky-jain-trolled-for-insulting-wife-ankita-lokhande-on-national-tv-bigg-boss-over-small-things-users-call-his-behaviour-disgusting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.