Video: नऊवारीचा स्वॅग! मराठमोळ्या लूकमध्ये दिपाने केला बादशहाच्या 'जुगनू'वर डान्स

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2021 02:15 PM2021-12-09T14:15:00+5:302021-12-09T14:15:00+5:30

Reshma shinde: प्रसिद्ध रॅपर बादशहाचं (badshah)  'जुगनू' हे गाणं तुफान ट्रेंड झालं. या गाण्यावर आतापर्यंत हजारोंच्या संख्येने नेटकऱ्यांनी इन्स्टा रिल केले असतील.

Video: Ninth Swag! Deepa danced on the emperor's 'Jugnu' in Marathmolya Luke | Video: नऊवारीचा स्वॅग! मराठमोळ्या लूकमध्ये दिपाने केला बादशहाच्या 'जुगनू'वर डान्स

Video: नऊवारीचा स्वॅग! मराठमोळ्या लूकमध्ये दिपाने केला बादशहाच्या 'जुगनू'वर डान्स

googlenewsNext

सोशल मीडियावर दररोज असंख्य ट्रेंड व्हायरल होत असतात. विशेष म्हणजे हे ट्रेंड सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक जण मोठ्या हौशीने फॉलो करतात.त्यातच गेल्या काही दिवसांपासून इन्स्टाग्रामवर विविध ट्रेंड येत असल्याचं दिसून येत आहे. यात प्रसिद्ध रॅपर बादशहाचं (badshah)  'जुगनू' हे गाणं तुफान ट्रेंड झालं. या गाण्यावर आतापर्यंत हजारोंच्या संख्येने नेटकऱ्यांनी इन्स्टा रिल केले असतील. यामध्येच आता हा ट्रेंड रंग माझा वेगळा या मालिकेतील दिपानेदेखील फॉलो केला आहे.

सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असलेल्या दिपाने म्हणजेच अभिनेत्री रेश्मा शिंदेने (reshma shinde) चक्क नऊवारी साडी नेसून हा ट्रेंड फॉलो केला आहे. रेश्माने तिच्या इन्स्टाग्रामवर जुगनू ट्रेंडचा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती नऊवारी साडी नेसून साजशृंगार करुन जुगनू गाण्यावर डान्स करत आहे.

दरम्यान, रेश्माचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. रेश्मा कायमच असे नवनवीन ट्रेंड फॉलो करत असते. यात अनेकदा ती मालिकेच्या सेटवर डान्स करत त्याचे व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. सध्या रेश्मा रंग माझा वेगळा या मालिकेत दिपा ही मुख्य भूमिका साकारत आहे. ही मालिका आता रंजक वळणावर आली आहे. दिपा आणि कार्तिक एकमेकांच्या समोरासमोर आले आहेत. त्यामुळे पुढे या दोघांच्या नात्यात कोणते नवीन बदल घडणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. 
 

Web Title: Video: Ninth Swag! Deepa danced on the emperor's 'Jugnu' in Marathmolya Luke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.