Videos Viral : असा साजरा झाला कपिल शर्माचा बर्थ डे, पत्नी गिन्नीने भरवला केक!!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 11:43 AM2019-04-02T11:43:15+5:302019-04-02T11:44:55+5:30
कॉमेडी किंग कपिल शर्मा याचा आज (2 एप्रिल) वाढदिवस. काल रात्री १२ च्या ठोक्याला कपिलचा वाढदिवस दणक्यात साजरा झाला. पत्नी गिन्नी चतरथ, आई शिवाय मित्रांसोबत कपिलने वाढदिवसाचे सेलिब्रेशन केले.
कॉमेडी किंग कपिल शर्मा याचा आज (2 एप्रिल) वाढदिवस. काल रात्री १२ च्या ठोक्याला कपिलचा वाढदिवस दणक्यात साजरा झाला. पत्नी गिन्नी चतरथ, आई शिवाय मित्रांसोबत कपिलने वाढदिवसाचे सेलिब्रेशन केले. कपिलची अख्खी टीम, सिंगर मिका सिंग, नवराज हंस, ऋचा शर्मा असे सगळे यावेळी उपस्थित होते. कपिलच्या या बर्थ डे पार्टीचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
या पार्टीत किकू शारदा व लाफ्टर क्वीन भारती सिंग या दोघांनी धम्माल डान्स केला. तर मिकाने डान्स नंबर्स गात पार्टीत रंग भरले. कपिलची आई आणि पत्नी गिन्नी या दोघेही थिरकताना दिसल्या.
याआधी कपिलने ‘द कपिल शर्मा शो’च्या सेटवर बर्थ डे साजरा केला होता. कोरिओग्राफर रेमो डिसूजा आणि गणेश आचार्य या एपिसोडमध्ये गेस्ट म्हणून आले होते. यावेळी कपिल आईला केक भरवताना दिसला होता.
डिप्रेशन, व्यसन अशा अनेक समस्यांवर मात करून कपिल शर्मा पुन्हा एकदा टीव्हीच्या दुनियेत परतला आहे. त्याचा कॉमेडी शो सध्या सोशल मीडियावर धूम करतोय. खुद्द सलमान खान कपिलचा हा शो प्रोड्यूस करतोय.
कॉमेडी किंग कपिल शर्माने गत डिसेंबरमध्ये ‘द कपिल शर्मा शो’द्वारे छोट्या पडद्यावर पुनरागमन केले. तत्पूर्वी वर्षभरात कपिलच्या आयुष्यात प्रचंड उलथापालथ झाली. तो अनेक वादांत सापडला. डिप्रेशन, मद्याचे व्यसन आदींमध्ये गुरफटला. यामुळे त्याचा शो बंद पडला. आता कपिल शमार्चे करिअर संपले असेच यानंतर सगळ्यांना वाटले. पण कपिलला वेळीच जाग आली आणि तो या सगळ्या दुष्टचक्रातून बाहेर पडला.