विजयने दिले अपूर्वाला सरप्राईज, पहा काय आहे हे सरप्राईज
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 07:15 AM2018-12-24T07:15:00+5:302018-12-24T07:15:00+5:30
कोल्हापूरमधील लोकांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या आशीर्वादाने अपूर्वा आणि विजय यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे.
प्रेमामध्ये कोणत्याही गोष्टीत फरक पाडला जात नाही, जे आहे ते आपुलकीने, प्रेमाने स्वीकारणे म्हणजे प्रेम. उंची, रुप, दिसणे, आर्थिक-सामाजिक परिस्थिती याला जास्त मोल न देता प्रेमाला महत्त्व देणे महत्त्वाचे असते आणि हे सिद्ध केले सोनी मराठीवरील प्रेमळ जोडी ‘अपूर्वा आणि विजय’ यांनी.
मेमरी कार्ड रिकव्हरीच्या निमित्ताने अपूर्वाचे विजयच्या मल्टीपर्पज दुकानात येणे हे विधिलिखितच होते. कारण अचानकपणे झालेल्या भेटीचे भविष्यात काहीतरी वेगळेच प्लानिंग तयार झालेले असते. अनेक अडचणींना धैर्याने सामोरे गेल्यावर ‘जुळता जुळता जुळतंय की’ मालिकेत अपूर्वा आणि विजयच्या आयुष्यात आनंदी प्रसंग घडणार आहे. कोल्हापूरमधील रंकाळा येथे एकदम हटके म्हणजे इतर मुले गुलाब किंवा महागडे गिफ्ट देऊन प्रपोज करतात पण विजयने मात्र अपूर्वाला ऐतिहासिक वारसा असलेल्या रंकाळाच्या मधोमध जाऊन जिलेबी स्टाईलने लग्नाची मागणी घातली होती आणि अपूर्वाने ती मागणी अगदीच भाऊक होऊन स्वीकारली आणि विजय अपूर्वानी आपल्या घरी सगळ्यांना ही गोड बातमी देऊन त्यांची परवानगी अखेर घेतली. या गोड प्रसंगानंतर ‘जुळता जुळता जुळतंय की’मध्ये अपूर्वा आणि विजयचे शुभमंगल होणार आहे.
कोल्हापूरमधील लोकांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या आशीर्वादाने अपूर्वा आणि विजय यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. आणि विशेष म्हणजे नवरी मुलीच्या व-हाडीत कोल्हापूरमधील मंडळी सामील होणार आहे. यावरुन हे स्पष्ट होते की या संपूर्ण सोहळ्यात अपूर्वा एकटी पडणार नसून तिच्या सोबतीला रक्ताच्या नात्याच्या पलीकडची लोक या प्रवासात तिच्यासोबत असणार आहेत. मुलीची बाजू खंबीर असणे खूप गरजेचे असते आणि कोल्हापूरकरांनी अगदी योग्य असा निर्णय घेऊन नवरी मुलीच्या बाजून लग्नात सामील होण्याचे ठरवले.
मुलीसाठी आणि तिच्या पालकांसाठी लग्नसोहळ्यातील सर्वात जास्त भावनिक गोष्ट म्हणजे ‘कन्यादान’. कन्यादान करताना पालकांना अश्रु आवरत नाही, ज्या मुलीचा तिच्या लहानपणापासून सांभाळ केला, प्रेमाने-लाडाने वाढवले, तिचे कन्यादान करणे हे कोणत्याही आई-वडीलांना भावूक करते. पण या मालिकेत कन्यादानासारखीच आणखी एक भावूक करणारी गोष्ट
म्हणजे अपूर्वाच्या घरातून भाऊ सोडला तर कोणीही या लग्नात उपस्थित नाही, त्यामुळे आपले कन्यादान कोण करणार हा प्रश्न अपूर्वाला सतत सतावत असतो. पण अपूर्वाने तिच्या स्वभावातून विजयच्या घरातील माणसांची मने जिंकली आहेत आणि म्हणूनच विजयचे आजोबा ‘नाना’ अपूर्वाचे कन्यादान करणार आहेत. तसेच ह्या लग्नाप्रसंगी विजयने अपूर्वाला एक सरप्राईज दिले आहे. लग्नाच्या ह्या गडबडीत विजयने वेळात वेळ काढून एक गिफ्ट घेतले होते, दुसरं तिसरं काय नसून तर अपूर्वाच्या आवडीचा पार्क अॅव्हेन्यूचा परफ्युम विजयने अपूर्वाला गिफ्ट केला आहे.
लग्नाप्रसंगी विजय प्रथेप्रमाणे मुलीनेच का वचन द्यायचं असं म्हणून तो पण सात वचनांपैकी काही वचन देणार आहे. ते कुठले वचन असणार हे पाहणयासाठी बघा लग्नाचा विशेष भाग २६ डिसेंबरला संध्याकाळी ७ वाजता फक्त सोनी मराठीवर पाहता येणार आहे.