विजयेंद्र कुमेरिया लॉकडाऊनच्या काळात आपल्या मुलीसह क्वॉलिटी टाईम करतोय एन्जॉय
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 19:02 IST2020-04-16T19:00:54+5:302020-04-16T19:02:20+5:30
विजयेंद्र कुमेरिया कायमच आपले कौटुंबिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. नुकतंच त्याने शेअर केलेल्या फोटोत बाप-लेकीचं प्रेमळ नातं पाहायला मिळत आहे.

विजयेंद्र कुमेरिया लॉकडाऊनच्या काळात आपल्या मुलीसह क्वॉलिटी टाईम करतोय एन्जॉय
कोरोना महामारीमुळे देशभरात २१ दिवसांचे लॉकडाऊन पूर्ण झाल्यानंतर पुन्हा ३ मे पर्यंत वाढवण्यात आले आहे. अशात आता आणखीन काही वेळ तरी घरातच सगळ्यांना राहणे बंधनकारक आहे. मात्र हा लॉकडाऊन काही कलाकार अगदी मेजेशीर घालवत आहेत. आपले आवडते कलाकार घरात राहून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत विविध गोष्ट करत स्वतःला बिझी ठेवत आहेत. 'नागीन भाग्य का जहरीला खेल'मधील देव म्हणून लोकप्रिय असलेला अभिनेता विजयेंद्र कुमेरिया, सुध्दा ही संधी साधून त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. विजयेंद्र कायमच आपले कौटुंबिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. नुकतंच त्याने शेअर केलेल्या फोटोत बाप-लेकीचं प्रेमळ नातं पाहायला मिळत आहे. लेकीसह खेळत निवांत आणि सुखी क्षणांचा आनंद घेत असल्याचं यांत दिसत आहे. या फोटोला कॅप्शनची गरजच नाही असंही त्याने म्हटले आहे. या फोटोवर रसिकांकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे.
या अभिनेत्याचे त्याच्या मुलीवर खूप प्रेम आहे आणि तिचा अभ्यास तिने चुकवू नये असे त्याला वाटते. आता तो घरातच असल्यामुळे, त्याने तिला शिकवायला सुध्दा सुरूवात केली आहे. यावर बोलताना, विजयेंद्र म्हणाला, “सर्व गोष्टी सकारात्मकतेने घेण्यास मला शिकवले गेले आहे. त्यामुळे, या लॉकडाऊनच्या काळाचा उपयोग मी बायकोला तिच्या कामात मदत करण्यात आणि माझी मुलगी किमया हिला तिच्या अभ्यासात मदत करण्यात घालवत आहे. ती खूपच हुशार आहे मुलगी आहे. आणि माझे तिच्या बरोबर छान जमते.
मी तिला तिच्या पुस्तकातून गोष्टी वाचायला तिला मदत करतो, आम्ही आकार शोधतो आणि आम्ही दोघे लिहायचा आणि रंगवायचाही सराव करतो. खूप मजा येते. याआधी, माझ्या व्यस्त वेळापत्रकामुळे, मला नेहमी अपराधी वाटत असे की मी त्यांना वेळ देऊ शकत नाही. पण आता, मी तो गमावलेला वेळ भरून काढत आहे.”