एजाजच्या गर्लफ्रेंडने मला घरी बोलावले अन् त्यानंतर जे काही घडले विकास गुप्ताने केला धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2020 02:36 PM2020-12-26T14:36:30+5:302020-12-26T14:37:34+5:30
विकास निक्कीसोबत चर्चा करत असताना त्याने सांगितले की, मी २१ वर्षाचा असताना एका मुलीसह माझी ओळख झाली. एकेदिवशी तिने मला तिच्या घरी बोलावले.
दिवसेंदिवस बिग बॉस १४ शो अधिकच रंजक होत आहे. घरात असणारे स्पर्धक आता वाद निर्माण करणा-यांसाठी खाजगी आयुष्यावर निशाणा साधत असल्याचे गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. एकमेकांची कुरघोडी काढत वाद निर्माण होत असल्यामुळे घरातले वातावरणही अधिकच तापले आहे. त्यात आता विकास गुप्ता आणि एजाज खान या स्पर्धकांचीही यात भर पडली आहे. आत्तापर्यंत अर्शी खान आणि विकास गुप्ता यांच्यातला वाद सा-यांनी पाहायला . हा वाद मिटत नाही तोवर एजाज खान आणि विकास गुप्ता यांचा वाद सध्या रंगत आहे. यात आता नॅशनल टीव्हीवर विकास गुप्ताने एजाज खानच्या प्रेयसीविषयी धक्कादायक वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे या दोघांमधील वाद विकोपाला गेल्याचं पाहायला मिळाले.
विकास निक्कीसोबत चर्चा करत असताना त्याने सांगितले की, मी २१ वर्षाचा असताना एका मुलीसह माझी ओळख झाली. एकेदिवशी तिने मला तिच्या घरी बोलावले. त्यावेळी एजाजही तिच्या घरी होता. एजाज तिच्या घरी कसा याची मला अजिबात कल्पाना नव्हती. मात्र नंतर अंदाज आला की, या दोघांमध्ये अफेअर आहे. त्यावेळी एजाजची गर्लफ्रेंड कुठेतरी त्याची फसवणूक करत असल्याचे मला वाटत होते. एजाजला आजही वाटते की, त्याची गर्लफ्रेंड माझ्यामुळे त्याच्यापासून लांब गेली.पण एजाजची गर्लफ्रेंडसह मी त्याचदिवशी संपर्क तोडला होता. एजाज आणि माझ्या मात्रीतही विनाकारण फुट पडली.
बिग बॉसच्या घरातही नेपोटिझमचा मुद्दा पेटला, याविषयी सलमान खान म्हणाला.....
राहुल वैद्यने जान कुमार सानूला नेपोटिझमचे प्रॉड्क्ट असे नाव दिले आणि त्याला सांगीतल की त्याचे वडील कुमार सानू यांच्यामुळेच तो शोमध्ये सहभागी होवू शकला. ही गोष्ट स्पर्धकांना अजिबात आवडली नाही. जॉनने सुध्दा स्पष्ट केले की त्याचे आईवडील त्याच्या बालपणीच वेगळे झालेले आहेत आणि त्याला त्याच्या आईने वाढवले आहे, त्यामुळे यात नेपोटिझमचा प्रश्नच येत नाही.'सलमानने सांगीतले की एखाद्या पालकांनी जर त्यांच्या मुलांसाठी काही केले असेल त्याला नेमोटिझमचे लेबल लावणे चुकीचे आहे. त्याने पुढे सांगीतले की जान नेपोटिझम मुळे गायक बनला असेल तर मग तो राहुल पेक्षा जास्त यशस्वी असायला हवा होता.