​काला टीका या मालिकेतील विनीत रैना आणि मयांक गांधी घेणार प्रेक्षकांचा निरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2017 04:34 PM2017-01-16T16:34:25+5:302017-01-16T16:36:47+5:30

काला टीका या मालिकेत प्रेक्षकांना दोन कलाकारांची एक्झिट लवकरच पाहायला मिळणार आहेत. या मालिकेत देवरी या खलनायकाची भूमिका साकारणारा ...

Vineet Raina and Mayank Gandhi to take part in black criticism | ​काला टीका या मालिकेतील विनीत रैना आणि मयांक गांधी घेणार प्रेक्षकांचा निरोप

​काला टीका या मालिकेतील विनीत रैना आणि मयांक गांधी घेणार प्रेक्षकांचा निरोप

googlenewsNext
ला टीका या मालिकेत प्रेक्षकांना दोन कलाकारांची एक्झिट लवकरच पाहायला मिळणार आहेत. या मालिकेत देवरी या खलनायकाची भूमिका साकारणारा विनित रैना आणि गतिमंद नंदूची भूमिका साकारणारा मयांक गांधी लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत. मालिकेच्या पुढील भागात देवरीचे गुपित उलगडणार आहे. हे गुपित उलगडताना तो सांगणार आहे की, त्याला एक सैतानी शक्तीने विशेष ताकद दिली आहे. त्यानुसार त्याचे रक्त जमिनीवर पडले तर त्यातून पाच नवे देवरी निर्माण होणार आहेत. त्यावर कालीची भूमिका साकारणारी सिमरन परिंजा त्याची हत्या करणार आहे. पण त्याचवेळी नंदू हुशारी दाखवून देवरीचे रक्त जमिनीवर पडू नये यासाठी त्याच्या अंगाखाली जाणार आहे आणि त्यात चिरडून त्याचादेखील मृत्यू होणार आहे. याविषयी नंदूची भूमिका साकारणारी मयांक सांगतो, "या मालिकेची संपूर्ण टीम आता माझ्या कुटुंबासारखी झाली आहे. या टीमला सोडून जाताना मला खूप दुःख होत आहे. मला माझा सेट, मेकअप रूम याची सतत आठवण येणार आहे. हा एक शेवट नसून माझ्यासाठी एक नवी सुरुवात असणार आहे. या मालिकेतील मी साकारत असलेला नंदू हा गतिमंद असल्याने मला या भूमिकेकडून खूप काही शिकायला मिळाले. या भूमिकेला प्रेक्षकांनी नेहमीच पसंती दिली, त्याच्यासाठी मी त्यांचा आभारी आहे." या मालिकेत देवरीची भूमिका साकारणारा विनित रैना सांगतो, "मी देवरीची भूमिका साकारत असल्याने लोक माझा तिरस्कार करत होते. सार्वजनिक ठिकाणी मला भेटल्यास त्यांच्या नजरेतून माझ्याविषयी असलेला राग मला दिसून येत असे. पण हीच माझ्या अभिनयाला त्यांनी दिलेली पावती होती. या मालिकेतील माझ्या सहकलाकारांचा निरोप घेताना मला खूप वाईट वाटत आहे." 

vineet raina kaala teeka

Web Title: Vineet Raina and Mayank Gandhi to take part in black criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.