विनोदवीर व्हीआयपीची 'भाकरवडी' मालिकेत एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 08:40 PM2019-04-11T20:40:00+5:302019-04-11T20:40:00+5:30

गोखले आणि ठक्कर कुटुंब प्रेक्षकांना मनोरंजक वेशभूषा स्पर्धेसाठी तयारी करत असताना हास्याचा डबल डोस देण्यासाठी सज्ज आहे. 

Vinod Viren's entry in the series 'Bhakaravadi' | विनोदवीर व्हीआयपीची 'भाकरवडी' मालिकेत एन्ट्री

विनोदवीर व्हीआयपीची 'भाकरवडी' मालिकेत एन्ट्री

googlenewsNext

सोनी सबचा कॉमेडी शो 'भाकरवडी' आपल्या प्रेक्षकांना विनोदी कथामूल्य आणि अत्‍यंत प्रतिभावान कलाकारांद्वारे खिळवून ठेवत असून स्वतःच्या चाहत्यांचा एक पाया त्याने तयार केला आहे. गोखले आणि ठक्कर कुटुंब प्रेक्षकांना मनोरंजक वेशभूषा स्पर्धेसाठी तयारी करत असताना हास्याचा डबल डोस देण्यासाठी सज्ज आहे. 

सर्वांना हसवण्याच्या उद्देशाने ते अशा प्रकारची वेशभूषा करायचे ठरवतात, जेणेकरून कुणीच एकमेकांना ओळखू शकणार नाही. अण्णा (देवेन भोजानी) आणि महेंद्र (परेश गनात्रा) हे दोघे एकमेकांना टक्कर देत आपल्याला ओळखण्याचा प्रयत्न करण्याचे आव्हान देतात. त्यामुळे भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबाबत ते शंका घेत असतात. त्याचवेळी अमोल (खंजन ठुंभार) ही स्पर्धा आणि त्यासाठी असलेले मुंबई दर्शनचे पारितोषिक आपल्या मुलांसाठी जिंकण्याच्‍या प्रयत्नात आहे. महेंद्र या क्षणाचा
फायदा घेऊन अमोलला मदत करतो आणि महान विनोदवीर व्हीआयपीला त्‍याला नकला शिकवण्यासाठी आमंत्रित करतो. अमोलला काहीही शिकवणे त्याच्या लहान मुलांसारख्या स्वभावामुळे आणि कमी एकाग्रतेमुळे कठीण काम आहे. व्हीआयपीकडे त्याला जिंकवण्यासाठी शिकवण्याइतका संयम असेल की, तो अमोलपुढे हार मानेल? दोन्ही कुटुंबे या स्पर्धेत अटीतटीची स्पर्धा करत असताना तणाव वाढू लागणार आहे, ते जिंकणे किंवा हरणे खेळाडू वृत्‍तीने स्विकारतील की, त्यांचा स्‍वाभिमान दुखावला जाईल? या स्पर्धेतून जे काही नुकसान होणार आहे, ते प्रेक्षकांना पाहता येईल.
अमोल गोखलेच्या भूमिकेतील खंजन ठुंभार म्हणाले की, 'अमोलची भूमिका खूप आव्हानात्मक आणि तितकीच धमाल आहे. मला इतक्या सुंदर प्रॉडक्शन आणि कलाकारांसोबत काम करताना खूप आनंद होत आहे. पुढील घटनाक्रम आमच्या प्रेक्षकांना खळखळून हसवेल आणि व्हीआयपी आमच्यासोबत चित्रीकरण करत असल्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला आहे. मला खात्री आहे की, प्रेक्षकांना आगामी एपिसोड्सची मजा आम्ही चित्रिकरणादरम्यान घेतलेल्या मजेपेक्षाही जास्त घेता येईल.'
अतिथी कलाकाराच्या भूमिकेत असलेले व्हीआयपी म्हणाले की, ''भाकरवडी' ही प्रेक्षकांचे मनोरंजन करून खूप चांगले काम करत आहे आणि इतके छान कलाकार व हॅट्सऑफसारखे प्रॉडक्शन हाऊस यांच्यासोबत तो अत्यंत लोकप्रिय शो ठरला आहे. मी स्वतःच्याच भूमिकेत अमोलला नकला शिकवण्यासाठी आणि स्पर्धेला तयार करण्यासाठी विशेष अतिथीच्या रूपात जाणार आहे. थोड्या काळासाठी सेटवर काम करणे हा माझ्यासाठी अत्यंत सुंदर अनुभवांपैकी एक असून इथे प्रत्येकजण एक मोठी टीम म्हणून काम करतो आणि ते खूप धमाल आहे. प्रेक्षकांना हा शो खूप आवडू लागला आहे आणि पुढेही ते याचा भरपूर आनंद घेतील, असे मला वाटते.'

Web Title: Vinod Viren's entry in the series 'Bhakaravadi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.