Urfi Javed : मोनू देओरीवर चढला उर्फी फिव्हर, ‘हा’ VIDEO पाहून हसू आवरणार नाही...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2022 02:15 PM2022-10-09T14:15:56+5:302022-10-09T14:16:35+5:30

Urfi Javed : व्हिडिओत मोनूने अगदी उर्फी स्टाईलचे कपडे घातलेले आहेत. उर्फीची कॉपी करतानाचा त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

viral social monu deori acted as urfi javed in new funny video | Urfi Javed : मोनू देओरीवर चढला उर्फी फिव्हर, ‘हा’ VIDEO पाहून हसू आवरणार नाही...!!

Urfi Javed : मोनू देओरीवर चढला उर्फी फिव्हर, ‘हा’ VIDEO पाहून हसू आवरणार नाही...!!

googlenewsNext

उर्फी जावेद (Urfi Javed) हे  सोशल मीडियावर सतत चर्चेत असणारं नाव. उर्फी केवळ एकाच कारणानं चर्चेत असते, ते म्हणजे तिची चित्रविचित्र ड्रेसिंग स्टाईल. होय, अतरंगी स्टाईलमधील तिचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. कधी उर्फी प्लास्टिकचा ड्रेस घालून मिरवते. कधी सेप्टीपिन्सपासून बनवलेला ड्रेस घालून दिसते. तर कधी टॉपऐवजी नुसता साखळ्या, कुलूपांचा नेकपीस घालून स्पॉट होते. अगदी पोत्यापासून बनवलेला ड्रेस घालून ती एकापेक्षा एक भारी पोझ देते.  बोल्ड लुकमुळे उर्फी अनेकदा ट्रोल होते. पण या ट्रोलिंगची पर्वा करेल ती उर्फी कुठली? आता याच उर्फीला टक्कर देण्यासाठी आणखी कुणीतरी आलं आहे. कोण? तर डान्सर व ब्लॉगर मोनू देओरी. मोनूने एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. तो पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

व्हिडिओत मोनूने अगदी उर्फी स्टाईलचे कपडे घातलेले आहेत. उर्फीची कॉपी करतानाचा त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. अनेकांनी या व्हिडिओवर स्माईल इमोजी पोस्ट केल्या आहेत.

‘बिग बॉस ओटीटी’ आधी उर्फी जावेद हे नाव फार कोणी ओळखत नव्हतं. म्हणायला या शोमध्ये उर्फी फक्त आठवडाभर राहिली. पण तिथून कदाचित सतत चर्चेत राहण्याचं कौशल्य पूरेपूर शिकून आली. तिची लोकप्रियता किती? तर आता उर्फी Most Searched Asian 2022 यादीत आली आहे. ना मालिका, ना मोठे शो, ना चित्रपट... काहीही नसताना उर्फीने केवळ अतरंगी फॅशनच्या जोरावर जगभरातील सर्वाधिक शोधल्या गेलेल्या व्यक्तीच्या यादीत स्थान मिळवलं आहे.

Web Title: viral social monu deori acted as urfi javed in new funny video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.