विशाखा सुभेदार घेणार 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून ब्रेक? पोस्ट होतीये व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 16:50 IST2022-04-01T16:49:44+5:302022-04-01T16:50:14+5:30
Visakha Subhedar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून विशाखा लवकरच बाहेर पडणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

विशाखा सुभेदार घेणार 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून ब्रेक? पोस्ट होतीये व्हायरल
आपल्या विनोदबुद्धीने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हजे विशाखा सुभेदार. गेल्या कित्येक वर्षांपासून विशाखा प्रेक्षकांचं अविरतपणे मनोरंजन करत आहे. सध्या विशाखा महाराष्ट्राची हास्यजत्रा या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून प्रेक्षकांना खळखळून हसवत आहे. मात्र, लवकरच ती या मालिकेतून ब्रेक घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून विशाखा लवकरच बाहेर पडणार असल्याचं सांगण्यात येत आहे. या पोस्टमध्ये विशाखाच्या शो सोडण्यामागील कारणाविषयी कोणताही खुलासा केलेला नाही. केवळ काही कारणास्तव विशाखा ही मालिका सोडत असल्याचं सांगण्यात आलं आहे.
लोकप्रिय अभिनेत्री विशाखा सुभेदारचा पतीदेखील आहे अभिनेता; मराठीसह हिंदी कलाविश्वात केलंय काम
दरम्यान, याविषयी विशाखाकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळे या वृत्ताला विशाखाचा दुजोरा नसल्याचं पाहायला मिळतं. तसंच दुसरीकडे विशाखाला एक नवी मालिका मिळाल्यामुळे तिने महाराष्ट्राची हास्यजत्रेला रामराम केल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, त्यामागील सत्य अद्यापही गुलदस्त्यात आहे.