विशाखा सुभेदार आणि नम्रता आवटे यांनी नवरा असावा तर असा या कार्यक्रमात शेअर केले त्यांचे सिक्रेट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2018 07:12 AM2018-01-15T07:12:20+5:302018-01-15T12:42:20+5:30
आपल्या प्रिय व्यक्तीचे म्हणजेच बायकोचे मन जिंकण्यासाठी कलर्स मराठी नवऱ्यासाठी एक अनोखे आव्हान घेऊन येत आहे. आजपर्यंत आपण गृहलक्ष्मींना ...
आ ल्या प्रिय व्यक्तीचे म्हणजेच बायकोचे मन जिंकण्यासाठी कलर्स मराठी नवऱ्यासाठी एक अनोखे आव्हान घेऊन येत आहे. आजपर्यंत आपण गृहलक्ष्मींना त्यांच्या इच्छापूर्तीसाठी नवरा असावा तर असा या कार्यक्रमात खेळताना बघितले. आता पहिल्यांदाच आपल्या लाडक्या गृहलक्ष्मीच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांचे नवरे या खेळात भाग घेणार आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षदा खानविलकर करत असून हर्षदाचे सूत्रसंचालन प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे.
नवरा असावा तर असा हा नुकताच सुरू झालेला कार्यक्रम प्रेक्षकांची मने जिंकत आहे. कार्यक्रमामध्ये आलेल्या जोड्या हर्षदाशी मनमोकळेपणाने गप्पा मारतात, त्यांच्या कडू-गोड आठवणी, त्यांचा प्रवास हर्षदाला सांगतात. प्रेक्षकांना आता मकर संक्रांत विशेष भाग कलर्स मराठीवर पाहायला मिळणार असून यामध्ये महाराष्ट्राच्या दोन लाडक्या अभिनेत्री हजेरी लावणार आहेत. विशाखा सुभेदार आणि नम्रता आवटे या त्या अभिनेत्री असून त्यांनी आपल्या पतीसोबत या कार्यक्रमामध्ये उपस्थिती लावून भरपूर गप्पा मारल्या आणि धम्माल मस्ती देखील केली.
विशाखा सुभेदार आणि त्यांच्या पतींनी त्या दोघांची भेट कशी झाली, ते एकमेकांच्या प्रेमात कसे पडले, त्यांचे लग्न कसे झाले हे सांगितले. विशाखा आपल्या नात्याबद्दल, नवऱ्याबद्दल सांगताना थोडीशी भावूक झाली. जेव्हा मला माझ्या नवऱ्याची सगळ्यात जास्त गरज होती, तेव्हा त्याने माझी साथ दिली. प्रत्येक क्षणी माझा नवरा माझ्यासोबत असतो, माझ्यापाठी तो खंबीरपणे उभा राहतो असे विशाखाने सांगितले. तसेच नम्रता आवटे आणि तिच्या नवऱ्याने देखील त्यांच्या नात्यातील काही महत्वाच्या गोष्टी कार्यक्रमामध्ये सांगितल्या. माझी खूप काळजी घेणारा आणि मला कधीही गरज लागली तर कुठेही आणि कुठल्याही क्षणी माझ्यासोबत असणारा नवरा मला मिळाला आहे याचे मला कौतुक वाटते आणि मला त्याचा नेहमीच आदर वाटतो. नम्रताच्या कामाबद्दल कौतुक करताना तिचे पती म्हणाले, मी नम्रताचे गिरगाव वाया दादर हे नाटके बघितले आणि माझ्या डोळ्यांत पाणी आले होते. ती खूप चांगली अभिनेत्री आहे. अशा अनेक आठवणी आणि खास क्षण या दोघींनी प्रेक्षकांसोबत शेअर केल्या.
Also Read : कम्फर्ट झोनमधून बाहेर पडणं गरजेचं-हर्षदा खानविलकर