जान्हवी कपूरच्या गाण्यावर विशाखा सुभेदारने दिले जबरदस्त एक्स्प्रेशन्स; व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 12:03 PM2024-06-29T12:03:35+5:302024-06-29T12:04:05+5:30

Vishakha subhedar: विशाखाने शेअर केलेल्या डान्स व्हिडीओमध्ये तिचे एक्स्प्रेशन्स, एखादं गाणं सादर करायची पद्धत कायमच नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत असते.

Vishakha Subhedar gave stunning expressions on Janhvi Kapoor's song;The video is going viral | जान्हवी कपूरच्या गाण्यावर विशाखा सुभेदारने दिले जबरदस्त एक्स्प्रेशन्स; व्हिडीओ होतोय व्हायरल

जान्हवी कपूरच्या गाण्यावर विशाखा सुभेदारने दिले जबरदस्त एक्स्प्रेशन्स; व्हिडीओ होतोय व्हायरल

 छोट्या पडद्यावरील महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) या शोच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे विशाखा सुभेदार(vishakha subhedar). आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी विशाखा उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच एक नृत्यांगनादेखील आहे. विशाखाचं जितकं प्रेम अभिनयावर आहे. तितकंच नृत्यावरही आहे. तिचं डान्सवरचं हे प्रेम कायम तिच्या पोस्टवरुन लक्षात येतं.

विशाखा सोशल मीडियावर कायम नवनवीन पोस्ट शेअर करत असते. यात तिने शेअर केलेल्या डान्स व्हिडीओमध्ये तिचे एक्स्प्रेशन्स, एखादं गाणं सादर करायची पद्धत कायमच नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत असते. अलिकडेच तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. तिचा हा व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

विशाखाने 'मिस्टर अँड मिसेस माही' या सिनेमातील 'तू हैं तो दिल धडकता हैं' या गाण्यावर व्हिडीओ शेअर केला आहे. नीती  मोहन हिच्या आवाजात स्वरबद्ध झालेलं हे गाणं जान्हवी कपूरवर चित्रीत झालं आहे.या गाण्यावर विशाखाने सुरेख एक्स्प्रेशन्स दिले आहेत. त्यामुळे नेटकरी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

Web Title: Vishakha Subhedar gave stunning expressions on Janhvi Kapoor's song;The video is going viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.