आदित्य ठाकरेंसमोर रॅप म्हणताना MC Stanची अशी उडाली तारांबळ, पाहा हा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 12:35 PM2023-02-23T12:35:02+5:302023-02-23T12:35:36+5:30

बिग बॉस १६चा विजेता रॅपर एमसी स्टॅन(MC Stan)ला म्युझिकल सेन्सेशन ऑफ द इयर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.

Watch this video of MC Stan rapping in front of Aditya Thackeray | आदित्य ठाकरेंसमोर रॅप म्हणताना MC Stanची अशी उडाली तारांबळ, पाहा हा व्हिडीओ

आदित्य ठाकरेंसमोर रॅप म्हणताना MC Stanची अशी उडाली तारांबळ, पाहा हा व्हिडीओ

googlenewsNext

नुकताच मुंबईत मोठ्या दिमाखात लोकमत डिजिटल क्रिएटर अवॉर्ड २०२३ (Lokmat Digital Creator Award 2023) पार पडला. या सोहळ्यात डिजिटल इन्फ्ल्युन्सर्सना गौरविण्यात आले. यावेळी बिग बॉस १६चा विजेता रॅपर एमसी स्टॅन(MC Stan)ला म्युझिकल सेन्सेशन ऑफ द इयर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्याने एक रॅप सादर केला. पण स्टेजवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यासमोर रॅप सादर करताना एमसी स्टॅनची तारांबळ उडाली. हे व्हिडीओत कैद झाले आहे. 

समोर आलेल्या व्हिडीओत पाहायला मिळत आहे की, पुरस्कार स्वीकारल्यानंतर एमसी स्टॅनला रॅप सादर करण्याची विनंती करण्यात आली. त्याने 'मैं बस्ती का हस्ती ब्रो...' म्हणत रॅपला सुरूवात केली. पण शेजारी उभ्या असलेल्या आदित्य ठाकरेंसमोर रॅप सादर करताना त्याची भांबेरी उडाली. 


२३ वर्षीय एमसी स्टॅन एक हिंदी रॅपर आहे. एमसी स्टॅन हा पुण्याचा आहे. त्याचं खरं नाव अल्ताफ तडवी आहे. पुण्यात जन्मलेल्या एमसी स्टॅनचं कुटुंब एका चाळीत राहायचं. १२ व्या वर्षी स्टॅनने कव्वाली गाण्यास सुरुवात केली. आज एमसी स्टॅन हिप-हॉप इंडस्ट्रीतील मोठा चेहरा आहे. युट्युबवरील त्याचे रॅप सॉन्ग प्रचंड लोकप्रिय आहेत. त्याची युनिक पर्सनॅलिटी बघून त्याला बिग बॉस हा शो ऑफर केला गेला आणि स्टॅननं या संधीचं सोनं केलं आणि  बिग बॉस १६ ट्रॉफी आपल्या नावावर केली. बिग बॉसची ट्रॉफी जिंकल्यानंतर स्टॅन चांगलाच चर्चेत आहे. 


ऑरमॅक्सने पॉप्युलॅरिटी लिस्ट म्हणजे लोकप्रिय व्यक्तींची यादी जारी केली आहे. जानेवारी २०२३ च्या Most Popular Non-Fiction Personalities यादीमध्ये एमसी स्टॅनने भाईजान सलमान खान याला मागे टाकलं आहे.

Web Title: Watch this video of MC Stan rapping in front of Aditya Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.