​याप्रकारे तुम्ही सहभागी होऊ शकता बिग बॉसमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2017 11:04 AM2017-06-06T11:04:23+5:302017-06-06T16:34:23+5:30

बिग बॉस या कार्यक्रमाचे आतापर्यंतचे सगळेच सिझन चांगलेच हिट झाले आहेत. आता या कार्यक्रमाचा 11 वा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस ...

In this way you can participate in Big Boss | ​याप्रकारे तुम्ही सहभागी होऊ शकता बिग बॉसमध्ये

​याप्रकारे तुम्ही सहभागी होऊ शकता बिग बॉसमध्ये

googlenewsNext
ग बॉस या कार्यक्रमाचे आतापर्यंतचे सगळेच सिझन चांगलेच हिट झाले आहेत. आता या कार्यक्रमाचा 11 वा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. बिग बॉसच्या आतापर्यंतच्या चार-पाच सिझनचे सूत्रसंचालन सलमान खानने केले आहे. सलमान खानशिवाय बिग बॉस या कार्यक्रमाचा प्रेक्षक विचार देखील करू शकत नाही. यंदाच्या सिझनमध्येदेखील सलमान खान सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. 
बिग बॉसच्या पहिल्या नऊ सिझनमध्ये केवळ सेलिब्रेटी आपल्याला पाहायला मिळाले होते. पण गेल्या सिझनमध्ये सेलिब्रेटींसोबत सामान्य लोकांनीदेखील या कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमाचे विजेतेपददेखील मनवीर गुजर या सामान्य माणसालाच मिळाले होते. 
बिग बॉस या कार्यक्रमात सहभागी व्हायची तुमची इच्छा असेल तर या सिझनला तुम्ही नक्कीच प्रयत्न करू शकता. कारण गेल्या सिझनपेक्षा यंदाच्या सिझनमध्ये सामान्य लोकांना अधिक संधी देण्यात येणार आहेत. 
बिग बॉस या कार्यक्रमाचे प्रक्षेपण कलर्स वाहिनीवर केले जाते. या वाहिनीचे सीईओ राज नायक यांनी ट्विटर या सोशल नेटवर्किंग साइटवर एक व्हिडिओ पोस्ट करून यंदाच्या सिझनमध्ये सामान्य लोकांना अधिक संधी दिली जाणार असल्याचे सांगितले आहे. 
सलमान खानचे लाखोहून अधिक चाहाते आहेत. बिग बॉस या कार्यक्रमाद्वारे सलमानला भेटण्याची खूप चांगली संधी त्याच्या चाहत्यांना मिळणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी https://www.voot.com/bigg-boss-registration या लिंकवर जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. 
या लिंकवर गेल्यावर तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती भरावी लागणार आहे. त्यानंतर स्पर्धकांची या कार्यक्रमासाठी निवड होणार आहे.
तुम्ही बिग बॉसचे आणि सलमानचे चाहते असाल तर नक्कीच बिग बॉसच्या घरात जाण्यासाठी याप्रकारे प्रयत्न करा. 

Web Title: In this way you can participate in Big Boss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.