स्पर्धक म्हणून आम्ही केलेल्या तयारीपेक्षा ज्यूरीच्या भूमिकेसाठी खूप जास्त तयारी करतोय- रोहित राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 08:00 AM2021-06-20T08:00:00+5:302021-06-20T08:00:00+5:30

रोहित राऊत लातूरमधून आलेल्या मुलाला इतका मोठा मंच मिळाला, स्वतःच गाणं प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळाली त्यामुळे माझ्यात फक्त गायक म्हणूनच नाही तर माणूस म्हणून पण खूप बदल झाला.

We are preparing for the jury role more than we did as a contestant Says Rohit Raut | स्पर्धक म्हणून आम्ही केलेल्या तयारीपेक्षा ज्यूरीच्या भूमिकेसाठी खूप जास्त तयारी करतोय- रोहित राऊत

स्पर्धक म्हणून आम्ही केलेल्या तयारीपेक्षा ज्यूरीच्या भूमिकेसाठी खूप जास्त तयारी करतोय- रोहित राऊत

googlenewsNext

सारेगमप लिटिल चॅम्प्समध्ये सगळ्यात 'रॉकींग परफॉर्मन्स' लातूरच्या रोहित राऊतचा असायचा. प्रेक्षकही रोहितला  'रॉक स्टार' म्हणून ओळखायला लागले. रोहितने संगीत क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली असून आता पुन्हा एकदा लिटिल चॅम्प्सच्या नव्या पर्वात रोहित ज्यूरीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्याच्या या खास अनुभवाविषयी रोहित राऊतने सांगितले.

दशकानंतर हे पर्व प्रेक्षकांच्या भेटीस येतंय त्यामुळे स्पर्धेतील आणि स्पर्धकांमधील फरक प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल. आम्ही या नव्या पर्वासाठी खूप जास्त उत्सुक आहोत आणि आम्ही तितकीच धमाल देखील करतोय. प्रेक्षकांना देखील हे पर्व बघताना तितकीच मजा येईल. या कार्यक्रमामुळे आम्हाला अफाट लोकप्रियता मिळाली. जगाच्या कान्याकोपऱ्यातून आम्हाला प्रेक्षकांचं प्रेम मिळालं त्यामुळे या मंचावर एका वेगळ्या भूमिकेतून परत येताना खूप जास्त आनंद होतोय.  सारेगमपमुळे आम्ही पंचरत्न म्हणून नावारूपाला आलो, १२ वर्षानंतर देखील आमची मैत्री तितकीच घट्ट आहे, आम्ही एकत्र काम देखील केलं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा एकत्र या मंचावर येऊन आम्ही खूप धमाल करतोय आणि जुन्या आठवणींना उजाळा देतोय.


टीव्हीवर जरी आम्ही १२ वर्षानंतर एकत्र येणार असलो तरी या १२ वर्षात आम्ही एकत्र खूप काम केलंय, खूप इव्हेंट्स एकत्र केले आहेत त्यामुळे आम्ही ५ जण एकत्र असलो कि खूप छान वाटतं. लिटिल चॅम्प्स हा कार्यक्रम आम्हा ५ ही जणांच्या खूप जवळचा आहे. या कार्यक्रमाचा अनेक आठवणी आम्हाला आनंद देऊन जातात. आणि आता परत त्याच आठवणींना उजाळा देत आम्ही नवीन पर्वातून प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज आहोत.

 एक स्पर्धक म्हणून आम्ही केलेल्या तयारीपेक्षा आता निभावत असलेल्या ज्यूरीच्या भूमिकेसाठी आम्ही सर्वजण खूप जास्त तयारी करतोय. कारण आता आमची जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे या १२ वर्षात आलेली आणि त्याधीची गाणी, आम्ही स्पर्धेत सादर केलेली गाणी यासर्वांचा आम्ही सखोल अभ्यास करतोय. आताचे लिटिल चॅम्प्स खूप कमालीचे आहेत त्यामुळे त्यांच्या सादरीकरणानंतर आम्ही त्यांचे मोठे ताई आणि दादा म्हणून त्यांना मार्गदर्शन करणार आहोत. त्यांची कुठे चूक झाली तर त्यांना न दुखावता त्यांना ती समजवून सांगायची जबाबदारी देखील आमच्यावर आहे. हे सगळे लिटिल चॅम्प्स खूप अभ्यास करून आले आहेत त्यामुळे आम्ही देखील तितकीच जोमाने तयारी करतोय.  


 लातूरमधून आलेल्या मुलाला इतका मोठा मंच मिळाला, स्वतःच गाणं प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळाली त्यामुळे माझ्यात फक्त गायक म्हणूनच नाही तर माणूस म्हणून पण खूप बदल झाला. या कार्यक्रमाने आम्हाला लोकप्रियताच नाही दिली तर लोकप्रियता मिळाल्यावर तुमची तयारी झालेली प्रतिमा जास्त काळ कशी टिकवून ठेवायची, स्वतःला माणूस म्हणून सिद्ध कसं करायचं हे शिकवलं आणि मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो कि त्यावेळी आम्हाला या सर्व गोष्टी शिकायला मिळाल्या. मी मंचाचा खूप ऋणी आहे कारण आज मी जो काही आहे तो या मंचामुळे आहे.

Web Title: We are preparing for the jury role more than we did as a contestant Says Rohit Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.