सीन करताना आम्ही एकमेकांकडे कधीच बघत नाही, 'ठरलं तर मग' सेटवरचे अर्जुन सायलीचे धमाल किस्से

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2023 06:43 PM2023-05-01T18:43:47+5:302023-05-01T18:44:13+5:30

Tharala Tar Mag : 'ठरलं तर मग' या मालिकेनं अल्पावधीतच प्रेक्षकांचे मन जिंकले. या मालिकेला सुरू होऊन अवघे दोन महिने होत आहेत. मात्र या दोन महिन्यात सलग नऊ आठवडे टीआरपीच्या स्पर्धेत मालिकेनं अव्वल स्थान पटकावले आहे.

We never look at each other during the scene, Arjun Sayli's funny stories on the set of Tharala Tar Mag | सीन करताना आम्ही एकमेकांकडे कधीच बघत नाही, 'ठरलं तर मग' सेटवरचे अर्जुन सायलीचे धमाल किस्से

सीन करताना आम्ही एकमेकांकडे कधीच बघत नाही, 'ठरलं तर मग' सेटवरचे अर्जुन सायलीचे धमाल किस्से

googlenewsNext

स्टार प्रवाहवरील ठरलं तर मग (Tharala Tar Mag) या मालिकेनं अल्पावधीतच प्रेक्षकांचे मन जिंकले. या मालिकेला सुरू होऊन अवघे दोन महिने होत आहेत. मात्र या दोन महिन्यात सलग नऊ आठवडे टीआरपीच्या स्पर्धेत मालिकेनं अव्वल स्थान पटकावले आहे. त्यामुळे ही मालिका प्रेक्षकांची लोकप्रिय मालिका ठरली आहे. अर्थात मालिकेचे कथानक आणि त्यातील सहसुंदर अभिनय करणारी पात्र ही एक जमेची बाजू म्हणावी लागेल. अर्जुन, सायली, प्रिया, पूर्णा आजी, कल्पना अशा सर्वच पात्रांनी मालिकेत धमाल आणली आहे. मालिकेच्या सेटवर या कलाकारांचे बॉण्डिंग खूप छान जुळून आलेले आहे, त्याचमुळे त्यांचे सीन अगदी चोख झालेले पाहायला मिळतात.

अर्जुन आणि सायलीच्या भूमिकेत असलेले अमित भानुशाली आणि जुई गडकरी यांच्यात तर खूप छान गट्टी जमलेली आहे. एवढे दिवस एकत्रित काम केल्यानंतर या दोघांनाही एकमेकांच्या स्वभावाबद्दल बरीचशी माहिती झालेली आहे. जुई अतिशय शांत आणि मोजकच बोलणारी आहे तिथेच अमित मात्र प्रचंड बडबडा आणि वातावरण हसतं खेळतं ठेवणारा. या दोघांचे अनेक मजेशीर सीन होत असतात, मात्र हे सिन शूट होताना हे दोघे एकमेकांकडे कधीच पाहत नाहीत. अर्थात त्याला कारणही तसेच आहे. या दोघांचे सीन शूट होताना चुकून जर दोघांची नजरानजर झालीच तर या दोघांनाही लगेचच हसायला येते.

जुईला प्रँक कधीच करता येत नाही, सेटवर अमितचा चष्मा बऱ्याचदा इथे तिथे पडलेला असतो, त्यामुळे जुई त्याचा चष्मा लपवण्यासाठी प्रयत्न करते. पण आपला चष्मा जुईनेच लपवलाय हे अमितला पक्कं ठाऊक असतं. त्यामुळे तो जुईकडे पाहताच तिच्या चेहऱ्यावरूनच याचे गुपीत उघडे पडते. जुईच्या मनात कधीच काही गोष्ट राहत नाही. सेटवरचे एखादं गुपित ती कोणासमोरही उघड करते, त्यामुळे तिला कुऱ्हाड असे म्हणून गप्प केले जाते. त्यामुळे सेटवर जुईला कुऱ्हाड हे नाव पडलं आहे. या सगळ्या गमतीजमती सेटवर घडत असल्यानेच कलाकारांचे एकमेकांशी छान सूर जुळून आलेले पाहायला मिळतात. जुई अतिशय गुणी मुलगी आहे, तिला माणसं जमवायला खूप आवडतात. तिला प्राण्यांबद्दलही खूप आपुलकी आहे असं अमित म्हणतो, त्यामुळे तो जुईसाठी तशा नवऱ्या मुलाचा शोध घेत आहे.

Web Title: We never look at each other during the scene, Arjun Sayli's funny stories on the set of Tharala Tar Mag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.