'...त्यावेळेला आम्ही उनाडक्या करत होतो; 'आई कुठे काय करते'मधील अनिरुद्धच्या 'त्या' पोस्टनं वेधलं सर्वांचं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 12:55 PM2022-01-11T12:55:06+5:302022-01-11T12:55:46+5:30

'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) मधील अनिरुद्ध उर्फ मिलिंद गवळी (Milind Gawali)ची इंस्टाग्रामवरील पोस्ट चर्चेत आली आहे.

'... we were doing Unadkya; Aniruddha's 'that' post in 'Aai Kuthe Kay Karte' attracts everyone's attention | '...त्यावेळेला आम्ही उनाडक्या करत होतो; 'आई कुठे काय करते'मधील अनिरुद्धच्या 'त्या' पोस्टनं वेधलं सर्वांचं लक्ष

'...त्यावेळेला आम्ही उनाडक्या करत होतो; 'आई कुठे काय करते'मधील अनिरुद्धच्या 'त्या' पोस्टनं वेधलं सर्वांचं लक्ष

googlenewsNext

स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिका आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte)च्या कथानक आणि पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेत अनिरुद्धची भूमिका अभिनेता मिलिंद गवळी (Milind Gawali)ने निभावली आहे. मिलिंद गवळी सोशल मीडियावर खूप सक्रीय असून बऱ्याचदा तो पोस्टमुळे चर्चेत येत असतो. आता पुन्हा एकदा त्याने इंस्टाग्रामवरील पोस्टमधून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. यावेळी त्याने एका शाळेतील शिक्षकाच्या निवृत्तीचा व्हिडीओ शेअर करत आपल्या शाळेतील आणि शिक्षकाच्या आठवणींना उजाळा दिला आहे.  

मिलिंद गवळीने व्हिडीओ शेअर करत लिहिले की, "गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा" सकाळी योगा प्राणायाम झाल्यानंतर , एखादा महत्वाचा मेसेज आला आहे का बघायला मोबाईल हातात घेतला, शारदाश्रम शाळेच्या ग्रुपमध्ये माझा वर्गमित्र भूपेन वरलीकरने एक व्हिडीओ शेअर केला होता. सहजच ओपन केला, एका शिक्षकाच्या निवृत्ती त्या दिवसाचा हा व्हिडीओ, पाहताना आधी नीटसं काही कळलं नाही, मग मात्र माझ्या डोळ्यातले अश्रू थांबेचना,
डोकं सुन्न झालं, इतका सुंदर, इतका खरा प्रसंग मी खूप दिवसात पाहिला नाहीये, अख्खी शाळा रडत होती, हेडमास्तर, बरोबरचे शिक्षक मंडळी आणि सगळेच विद्यार्थी ढसाढसा रडतात, किती प्रामाणिकपणे आणि किती प्रेमाने या गुरुजींनी या मुलांना अनेक वर्ष शिकवला असणार, मुलांना घडवण्याचा प्रयत्न केला असणार, आणि आज तो रिटायर होतोय, माझ्या सगळ्या गुरुजनांची, शिक्षकांची आठवण झाली. माझ्या दास गुप्ता टीचर, वर्गीस टीचर, सोनी टीचर, गोखले टीचर, शेट्टी सर, देशपांडे सर, कर्णिक टीचर , आकटे टीचर, कुमार सर, रायरीकर सर, आचरेकर सर, अमीन सयानी सर, परत लहान व्हावसं वाटतं, परत या सगळ्यां कडे प्रामाणिकपणे शिकावं असं वाटल, ज्यावेळेला हे सगळे शिक्षक मंडळी जिवओतून आम्हाला शिकवत होते, त्या वेळेला मात्र आम्ही उनाडक्या करत होतो, अभ्यासाकडे लक्ष दिलं नाही, आज खूप वाईट वाटतं.


त्याने पुढे लिहिले की, गोखले टीचर रिटायर होऊन पुण्यात सेटल झाल्यात, गोखले टीचर माझी सिरीयल "आई कुठे काय करते" न चुकता बघत असतात, त्यांचा मेसेज सगळ्यात मोठं बक्षीस असतं माझ्यासाठी. माझी आई माझ्या नकळत माझ्या शाळेत यायची आणि या शिक्षकांना भेटायची, विनंती करायची की माझ्या लेकराकडे जरा जास्त लक्ष द्या, तू थोडा अल्लड आहे, अभ्यासात लक्ष नसतं त्याचं, गोखले टीचरांशी मागच्या वेळेला बोललो त्या वेळेला त्यांनी ही आठवण मला सांगितली ,"तुझी आई मला अजूनही चांगली आठवते , नेहमी शाळेत यायची, तुझ्या प्रगती ची चौकशी करायला, तुझ्याकडे लक्ष ठेवायला सांगायची" ही सगळीच थोर माणस आहेत, मी भाग्यवान म्हणून अशा मातेच्या पोटी जन्माला आलो, भाग्यवान म्हणून मला असे गुरुजन मिळाले,
खरंच आपल्याकडे इतके चांगले शिक्षक, गुरुजन आहेत, म्हणून आपला देश जगात भारी आहे, माझा सांगलीचा मित्र वसंत हंकारे,असाच एक प्रामाणिक आणि प्रेमळ देशभक्तीने भारावलेला, मातृप्रेम मातृभूमीवर प्रेम आणि त्याच्या सगळ्या विद्यार्थ्यांवर आतोनात प्रेम करणारा वसंत हंकारे. व्हिडीओ बघून त्याची पण खूप आठवण आली. सगळ्या गुरुजनांना माझा कोटी कोटी प्रणाम. 

Web Title: '... we were doing Unadkya; Aniruddha's 'that' post in 'Aai Kuthe Kay Karte' attracts everyone's attention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.