डान्स महाराष्ट्र डान्समध्ये स्पर्धक थिरकरणार माधुरी दीक्षितच्या चोली के पीछे क्या है, चोली के पीछे?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2018 09:03 AM2018-04-10T09:03:50+5:302018-04-10T14:33:50+5:30

खलनायक सिनेमातील माधुरी दीक्षितचे चोली के पीछे क्या है, चोली के पीछे? हे दिलखेचक गाणं आजही लोकांच्या आठवणीत ताजे ...

What is behind the brassiere of the competitor Thirkaran Dance Dance Dance in Maharashtra Dance, behind the bodice? | डान्स महाराष्ट्र डान्समध्ये स्पर्धक थिरकरणार माधुरी दीक्षितच्या चोली के पीछे क्या है, चोली के पीछे?

डान्स महाराष्ट्र डान्समध्ये स्पर्धक थिरकरणार माधुरी दीक्षितच्या चोली के पीछे क्या है, चोली के पीछे?

googlenewsNext
नायक सिनेमातील माधुरी दीक्षितचे चोली के पीछे क्या है, चोली के पीछे? हे दिलखेचक गाणं आजही लोकांच्या आठवणीत ताजे आहे. हे गाणे आजही कुठेही ऐकले तरीही आपले पाय थिरकतात. डान्स महाराष्ट डान्स हा कार्यक्रम प्रेक्षकांना प्रचंड आवडत असून या कार्यक्रमातील सगळ्याच स्पर्धकांचे कौतुक होत आहे. या कार्यक्रमाचा विजेता कोण ठरणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागलेली आहे. या कार्यक्रमात होणाऱ्या निरनिराळ्या प्रयोगांचे सध्या चांगलेच कौतुक होत आहे. झी युवाच्या या व्यासपीठावर महाराष्ट्रातील उत्कृष्ट नर्तकांनी आजवर अनेक वेगवेगळे परफॉर्मन्स सादर केले आहेत. त्यात एली एन्जल्स या डान्स ग्रुपने त्यांच्या परफॉर्मन्सनी जज आणि प्रेक्षकांना नेहमीच भारावून टाकले आहे.
येत्या बुधवारी म्हणजेच ११ एप्रिल आणि १२ एप्रिलला प्रेक्षकांना या कार्यक्रमात मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांना पाहाता येणार आहे .त्यांच्या स्वागतासाठी डान्स महाराष्ट्र डान्सच्या सर्वच डान्सरनी भरपूर मेहनत घेतली आहे. बुधवारी होणाऱ्या एपिसोडमध्ये डान्स महाराष्ट्र डान्सच्या स्पर्धकांनी मराठी चित्रपट सृष्टीला मानवंदना दिली आणि  डान्स महाराष्ट्र डान्सच्या एली एन्जल्सनी आठ लहान माधुरीच या मंचावर आणल्या होत्या. त्यांच्या अप्रतिम नृत्यामुळे परीक्षकही त्यांच्यासोबत थिरकले आणि त्यांना शुभेच्छासुद्धा दिल्या.
डान्स महाराष्ट्र डान्स या कार्यक्रमाचे तीन मुख्य शिलेदार आहेत ते म्हणजे या कार्यक्रमाचे परीक्षक सिद्धार्थ जाधव, फुलवा खामकर आणि आदित्य सरपोतदार. हा व्यासपीठ चार वर्षांवरील प्रत्येक नृत्य प्रेमींसाठी खुला आहे त्यावर कोणत्याही डान्स प्रकारचे कसलेही बंधन नाही. यात एखादा डान्सर सोलो किंवा ग्रुपमध्ये आणि मुख्य म्हणजे विविध नृत्यशैली लोकांसमोर आणू शकतो. आजपर्यंत कोणत्याही वाहिनीने या प्रकारचा खुला मंच डान्सरसाठी उपलब्ध करून दिलेला नव्हता आणि हेच डान्स महाराष्ट्र डान्स या कार्यक्रमाचे वेगळेपण आहे. या प्रकारची मजा प्रेक्षकांना दर बुधवार ते शुक्रवार रात्री ९:३० वाजता झी युवावार पाहायला मिळत आहे. 

 

 

Web Title: What is behind the brassiere of the competitor Thirkaran Dance Dance Dance in Maharashtra Dance, behind the bodice?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.