पूजा मिश्राने आता हे काय केले?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2017 06:10 AM2017-03-31T06:10:19+5:302017-03-31T11:40:19+5:30
पूजा मिश्रा ही तिच्या कामापेक्षा नेहमी तिच्या वादग्रस्त विधानांसाठी चर्चेत असते. बिग बॉसमध्येदेखील पूजा स्पर्धक म्हणून गेली होती. बिग ...
प जा मिश्रा ही तिच्या कामापेक्षा नेहमी तिच्या वादग्रस्त विधानांसाठी चर्चेत असते. बिग बॉसमध्येदेखील पूजा स्पर्धक म्हणून गेली होती. बिग बॉसच्या घरात असताना तिचा अनेक जणांसोबत वाद झाला होता. बिग बॉस सिझन ५ मधील सगळ्यात वादग्रस्त स्पर्धक म्हणून तिला ओळखले जाते. पूजाने दिल का रिश्ता या चित्रपटात एक आयटम साँगदेखील सादर केले होते.
पूजा आता मॉडलिंग आणि अभिनयानंतर निर्मितीकडे वळली आहे. ती स्वतःचे प्रोडक्शन हाऊस सुरू करण्याच्या तयारीत आहे. पूजा या नवीन व्यवसायामार्फत चित्रपट आणि मनोरंजनपर कार्यक्रमांची निर्मिती करणार आहे. तिच्या प्रोडक्शन हाऊसचे नाव पूजा मिश्रा प्रोडक्शन असणार आहे. या प्रोडक्शन हाउस अंतर्गत 'जड' या चित्रपटाची ती निर्मिती करणार आहे.
येत्या काही काळात चित्रपट निर्मितीवर पूजाला लक्ष केंद्रित करायचे आहे. तसेच भविष्यात पूजाला आपला स्टुडिओसुद्धा सुरू करायचा आहे.
मनोरंजन आणि करमणूक क्षेत्रात दिवसेंदिवस कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे. दरवर्षी या क्षेत्रात ७५० अब्ज रुपयांची वाढ होत आहे. पूजा मिश्रा पॉडक्शन २०१० सालापासून ते आजवर प्रत्यक्षरित्या आणि अप्रत्यक्षरित्या बॉलीवूड व्यवसायाशी संबंधित आहे. भविष्यात पूजा प्रोडक्शन हाऊसने छोट्या छोट्या व्यवसायिकांना सोबत घेऊन चांगल्या कार्यक्रमांची निर्मिती करण्याचे ठरवले आहे. सध्या पूजा अनेक वाहिन्यांशी जुळलेली असून भविष्यात त्यांच्यासोबत काम करणार असल्याचे तिने सांगितले. तसेच प्रेक्षकांची रुची लक्षात घेऊन मनोरंजनपर कार्यक्रमाची निर्मिती करणार असल्याचेही पूजाने सांगितले.
पूजा निर्मितीक्षेत्रात आपले नाव कमवते की नाही हे येणार काळच ठरवेल.