इस प्यार को क्या नाम दूँ फेम अविनाश सचदेव पत्नी शालमली देसाईला देणार घटस्फोट?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2017 07:57 AM2017-07-17T07:57:51+5:302017-07-17T13:27:51+5:30
इस प्यार को क्या नाम दूँ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारा अविनाश सचदेव सध्या चांगलाच टेन्शनमध्ये आला आहे. अविनाशने ...
इ प्यार को क्या नाम दूँ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारा अविनाश सचदेव सध्या चांगलाच टेन्शनमध्ये आला आहे. अविनाशने याआधी हातिम, करम अपना अपना, किस देस में है मेरा दिल, छोटी बहू यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. 2015मध्ये त्याने शालमली देसाईसोबत लग्न केले होते. इस प्यार को क्या नाम दूँ या मालिकेत तिने अविनाशसोबत काम केले होते. ती या मालिकेत त्याच्या वहिनीच्या भूमिकेत होती. या मालिकेनंतर काहीच दिवसांत त्यांनी लग्न केले. अविनाश नेहमीच त्याच्या सोशल नेटवर्किंग साइटवर तिच्यासोबतचे फोटो पोस्ट करत असतो. पण आता त्या दोघांच्या नात्यात दुरावा आला असल्याचे म्हटले जात आहे. ते लवकरच घटस्फोट देखील घेणार असल्याच्या बातम्या काही दिवसांपासून येत आहेत. अविनाश आणि शालमलीने यावर बोलणे गेल्या काही दिवसांपासून टाळले होते. पण आता यावर दोघांनीही आपले मौन तोडले आहे. त्यांच्यात काहीही बिनसले नसून ते आजही एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स आहेत असे अविनाशने नुकतेच एका मुलाखतीत सांगितले आहे. अविनाशने इंडियन विकी मीडिया या वेबसाईटशी बोलताना सांगितले आहे की, गेल्या काही दिवसांपासून माझ्या आणि शालमलीच्या नात्याविषयी खूप काही मीडियामध्ये लिहिले जात आहे. तसेच बोलले जात आहे. पण या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत. आमच्या दोघांमध्ये काही समस्या आहेत हे खरे असले तरी या समस्या दूर करण्याचा आम्ही दोघे मिळून प्रयत्न करत आहोत. आजही आम्ही एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स आहोत. प्रत्येकाच्या आय़ुष्यात समस्या या निर्माण होत असतातच. त्याप्रमाणे आमच्या नात्यात देखील काही प्रोब्लेम आहेत. पण या मुळे आम्ही आमच्या नात्याला पूर्णविराम देणार आहोत असे म्हटले जात आहे, ते पूर्णपणे चुकीचे आहे.
Also Read : अपघातानेच मी अभिनयक्षेत्रात आले: रितू शिवपुरी
Also Read : अपघातानेच मी अभिनयक्षेत्रात आले: रितू शिवपुरी