​ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत होणार या कलाकारांची एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2016 04:23 PM2016-11-16T16:23:53+5:302016-11-16T16:23:53+5:30

ये रिश्ता क्या कहलाता है ही मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेने काही महिन्यांपूर्वी लीप ...

This is what the relationship is called and the artist's entry in the series | ​ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत होणार या कलाकारांची एंट्री

​ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत होणार या कलाकारांची एंट्री

googlenewsNext
रिश्ता क्या कहलाता है ही मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेने काही महिन्यांपूर्वी लीप घेतला होता. त्यानंतर या मालिकेत अनेक नवीन कलाकार आपल्याला पाहायला मिळाले होते. आता पुन्हा एकदा या मालिकेत काही नवीन कलाकारांची एंट्री होणार आहे.
मालिकेत कार्तिकची भूमिका साकारणाऱ्या मोहसिन खानचे कुटुंब दाखवण्यात येणार आहे. संपूर्ण गोएंका कुटुंब आता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. कहानी घर घर की या मालिकेद्वारे प्रकाशझोतात आलेला अभिनेता अली हसन या मालिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे. या मालिकेत तो कार्तिकच्या काकांची भूमिका साकारणार असून त्याच्या आईच्या भूमिकेत छोट्या पडद्यावरची एक प्रसिद्धी अभिनेत्री दिसणार आहे.
सपना बाबुल का ... बिदाई या कार्यक्रमामुळे पारुल चौहान लोकांच्या घराघरात पोहोचली. या मालिकेची निर्मिती राजन शाही यांनी केली होती. ये रिश्ता क्या कहलाता है या कार्यक्रमाचे निर्मातेदेखील तेच आहेत. त्यामुळे आता पारुल राजन यांच्यासोबत पुन्हा काम करणार आहे. कार्तिकच्या आईच्या भूमिकेत ती झळकणार असून या मालिकेतील तिची भूमिका आणि लूक हा बिदाईतील तिच्या भूमिकेपेक्षा पूर्णपणे वेगळा असणार आहे. पारुल लवकरच या मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. 
कार्तिकच्या वडिलांची भूमिका साकारण्यासाठी मानव गोहिलला विचारण्यात आले आहे. मानवने नुकतेच यम है हम या मालिकेत काम केले होते. पण मानव ही भूमिका साकारणार की नाही याचा त्याने अद्याप निर्णय घेतलेला नाही. 



Web Title: This is what the relationship is called and the artist's entry in the series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.