​दृष्टी का करतेय आईला मिस?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2016 12:09 PM2016-11-12T12:09:31+5:302016-11-12T12:09:31+5:30

परदेस मैं हे मेरा दिल या मालिकेत दृष्टी धामी नैना ही भूमिका साकारत आहे. या मालिकेत नैना आणि तिची ...

What is the sight of Miss Mother? | ​दृष्टी का करतेय आईला मिस?

​दृष्टी का करतेय आईला मिस?

googlenewsNext
देस मैं हे मेरा दिल या मालिकेत दृष्टी धामी नैना ही भूमिका साकारत आहे. या मालिकेत नैना आणि तिची आई यांमध्ये खूप छान नाते आपल्याला पाहायला मिळत आहे. त्या दोघी आई आणि मुलीपेक्षादेखील एकमेकांच्या चांगल्या मैत्रिणी आहेत. या मालिकेची कथा आणि त्यातील दृष्टीची व्यक्तिरेखा तिला फार आवडते. या मालिकेचे चित्रीकरण करताना ती नेहमीच भूतकाळात रमते असे तिचे म्हणणे आहे. या मालिकेचे संवाद तर तिच्या मनाला भिडतात असे ती सांगते. या मालिकेच्या चित्रीकरणाच्या दरम्यान ती तिच्या आईला खूप मिस करते. ती अभिनयक्षेत्रात येण्याआधी जास्तीत जास्त वेळ कुटुंबियांसोबत घालवायची. पण ती सध्या मालिकांच्या चित्रीकरणात व्यग्र असल्याने तिला तिच्या आईसोेबत वेळच घालवायला मिळत नाही. आईला वेळ देता येत नसल्याचे तिला खूपच वाईट वाटते. याविषयी दृष्टी सांगते, "या मालिकेत माझ्या आईची भूमिका साकारणाऱ्या आशा आणि माझी केमिस्ट्री खूपच छान आहे. त्यांच्यासोबत काम करताना अनेकवेळा मी माझ्या आईसोबतच असल्याचा मला भास होतो. मालिकेत माझे आणि माझ्या आईचे जसे नाते दाखवले आहे तसेच खऱ्या आयुष्यतही माझ्या आईसोबत माझे नाते आहे. त्यामुळे ही भूमिका साकारताना अभिनय करत आहे असे मला वाटतच नाही. मी माझ्या मालिकांच्या चित्रीकरणात व्यग्र असल्याने अनेकवेळा मला माझ्या आईला आणि कुटुंबियांना वेळ देता येत नाही. पण चित्रीकरणातून वेळ मिळाल्यास अथवा सुट्ट्यांच्या दिवशी जास्तीत जास्त वेळ मी माझ्या आईसोबत आणि कुटुंबियांसोबत घालवायचा प्रयत्न करते."
  

Web Title: What is the sight of Miss Mother?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.