​गोकुळधाम सोसायटीतील रहिवाशी या पैशांचे आता काय करणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2016 12:04 PM2016-11-16T12:04:54+5:302016-11-16T12:04:54+5:30

500-1000च्या नोटा बदलल्यामुळे सगळ्या बँका आणि पोस्ट ऑफिसमध्ये सध्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. काळा पैसा ज्यांच्याकडे आहे, ...

What will the residents of Gokuldham Society do now? | ​गोकुळधाम सोसायटीतील रहिवाशी या पैशांचे आता काय करणार?

​गोकुळधाम सोसायटीतील रहिवाशी या पैशांचे आता काय करणार?

googlenewsNext
500-
1000च्या नोटा बदलल्यामुळे सगळ्या बँका आणि पोस्ट ऑफिसमध्ये सध्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. काळा पैसा ज्यांच्याकडे आहे, त्यांचे तर धाबे चांगलेच दणाणले आहे. काही जणांनी आयकर विभागाचा धसका घेऊन पैसे कचऱ्याच्या पेटीत टाकले आहेत किंवा ते पैसे जाळत आहेत. आपण ज्या पैशांची लक्ष्मी म्हणून इतके दिवस पूजा केली. त्याचाच आज अनादर केला जात आहे.
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत नेहमीच सामाजिक प्रश्नांवर प्रकाशझोत टाकला जातो. आतादेखील 500-1000च्या नोटाबदलाचा मुद्दा या मालिकेद्वारे अधोरेखित केला जाणार आहे. पैसे ही लक्ष्मी असते आणि तिचा सांभाळ आपण योग्यप्रकारे केला पाहिजे अशी शिकवण या मालिकेद्वारे दिली जाणार आहे. या मालिकेत आता लक्ष्मीदेवी जेठालालच्या स्वप्नात येऊन लोकांनी पैसे जाळू नये, पाण्यात टाकू नये यासाठी आवाहन करणार आहेत असे दाखवण्यात येणार आहे. याविषयी या मालिकेत जेठालालची व्यक्तिरेखा साकारणारा दिलीप जोशी सांगतो, "सध्या आपल्याकडे जी परिस्थिती आहे, त्यावर भाष्य करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. आमच्या मालिकेमुळे काही लोकांच्या वागणुकीत जरी फरक पडला तरी जे आमचे यश असणार आहे. लोक पैसे फेकून देत आहेत त्यामुळे लोकांनी तसे करू नये यासाठी मालिकेद्वारे आम्ही प्रयत्न करणार आहोत. तुम्ही मेहनत करून पैसे मिळवले आहेत. हे पैसे फेकून न देता बँकेत जमा करा किंवा एखाद्या दानपेटीत टाका. पण ते पैसे वाया घालवू नका असे आम्ही मालिकेद्वारे लोकांना सांगणार आहोत."

Web Title: What will the residents of Gokuldham Society do now?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.