क्या कुसूर है अमला का या मालिकेच्या सेटवर पंखुडी अवस्थीने न्यूडल्सवर काढले दिवस
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2017 12:14 PM2017-03-27T12:14:59+5:302017-03-27T17:44:59+5:30
क्या कुसूर है अमला का ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेची कथा फातमागुल या तुर्की मालिकेवर ...
क या कुसूर है अमला का ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेची कथा फातमागुल या तुर्की मालिकेवर आधारित आहे. कठीण प्रसंगाना धीराने तोंड देणाऱ्या एका साध्या, लाघवी आणि तीव्र, इच्छाशक्ती असलेल्या मुलीची या मालिकेत कथा पाहायला मिळणार आहे.
क्या कुसूर है अमला का या मालिकेच्या कथानकानुसार या मालिकेच्या टीमने हिमाचल प्रदेशमध्ये चित्रीकरण करणे पसंत केले. या मालिकेच्या अनेक भागांचे चित्रीकरण तिथेच करण्यात आले आहे. मालिकेचे चित्रीकरण तेथील काही निसर्गरम्य ठिकाणांत करण्यासोबत या मालिकेच्या चित्रीकरणासाठी एका छानसा सेटदेखील तिथे उभारण्यात आला होता. या मालिकेत अमला ही प्रमुख भूमिका पंखुडी अवस्थी साकारत आहे. या मालिकेच्या चित्रीकरणाच्या दरम्यान केवळ न्यूडल्स आणि मोमोज खाऊन पंखुडीने दिवस घालवले. पंखुडी ही स्वच्छतेच्या बाबतीत विशेष दक्ष असते. हिमाचल प्रदेशमध्ये चित्रीकरण करत असताना मालिकेची संपूर्ण टीम तिथले स्थानिक जेवण जेवत असे. पण पंखुडीच्या मनात या खाद्यपदार्थांच्या दर्जाबद्दल शंका उपस्थित झाल्यामुळे तिने संपूर्ण काळ केवळ मोमो आणि न्यूडल्सच खाणे पसंत केले. या मालिकेच्या सेटवर गॅस आणि काही भांडी असल्याने ती स्वतःचे जेवण स्वतःच बनवत असे. चित्रीकरणातून थोडा जरी वेळ मिळाला तर ती धरमशालामधील गरमागरम वातावरणात स्वतःच न्यूडल्स आणि मोमो बनवत असे आणि ते खात असे. पंखुडीला स्थानिक जेवण न आवडल्यामुळे तिने न्यूडल्स खाण्याचवरच भर दिला होता. काहीही भलतसलते खाऊन आजारी पडण्यापेक्षा तिने न्यूडल्स खाणेच पसंत केले.