जेव्हा लग्नमंडपातूनच पळ काढला या अभिनेत्रीने,त्यानंतर घडले असे काही
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2018 06:43 AM2018-04-12T06:43:44+5:302018-04-12T12:13:44+5:30
चांगला पती मिळावा,यासाठी सासरच्या मंडळींना खुश करण्यासाठी मुलींना विविध कला शिकवून आपल्यात बदल घडवून आणण्याचे प्रशिक्षण देणा-या अनेक शाळांचे ...
च ंगला पती मिळावा,यासाठी सासरच्या मंडळींना खुश करण्यासाठी मुलींना विविध कला शिकवून आपल्यात बदल घडवून आणण्याचे प्रशिक्षण देणा-या अनेक शाळांचे पेव पंजाबमध्ये फुटले आहे.पण आपण जशा आहोत,तसेच आपल्याला आपल्या भावी पतीने स्वीकारले पाहिजे, यासाठी आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य कायम ठेवण्यासाठी संघर्ष करणा-या मीरा (आदिती शर्मा) नावाच्या मुलीची कथा छोट्या पडद्यावर सध्या पाहायला मिळत आहे.‘कलीरें’ या मालिकेतील मीराला तिच्या या प्रवासात साथ देण्यासाठी विवान (अरिजित तनेजा) हा लंडनमध्ये मोठा उद्योगपती असोत आणि तोही एका गोष्टीच्या शोधात थेट पंजाबमध्ये येतो.पण मालिकेच्या अलीकडच्या काही भागांमध्ये प्रेक्षकांनी पाहिले की मीराचे कुटुंबीय तिचे लग्न सुमेरशी (परमवीरसिंग चीमा) लावण्याची तयारी करत असतात.‘मेरे ब्रदर की दुल्हन’ चित्रपटात अभिनेत्री कतरिना कैफने साकारलेल्या वधूसारखीच व्यक्तिरेखा या मालिकेत आदितीने साकारली आहे.मीरा ही एक स्वच्छंदी आणि आनंदी स्वभावाची मुलगी असून तिला भारतीय परंपरेच्या चोकटीतील वधू बनण्यात स्वारस्य नसते. तिला तिचे जीवन मुक्तपणे आणि आपल्या मर्जीनुसार जगायचे असते. मीरा ती स्पष्टवक्ती असून तिला आपले व्यक्तिमत्त्व दुसऱ्या कोणासाठी किंवा सामाजिक दबावामुळे बदलण्याची इच्छा नसते. सुमेरबरोबरच्या लग्नाची तारीख जसजशी जवळ येते,तशी मीराला सुमेरच्या व्यक्तिमत्त्वाची काळी बाजू दिसून येते. त्यामुळे ‘मेरे ब्रदर की दुल्हन’ चित्रपटात अभिनेत्री कतरिना कैफने ज्याप्रमाणे मोटाररबाईकवरून लग्नापूर्वी पळ काढते अगदी त्याचप्रमाणेमीराही करते.अतिशय भरजरी लालभडक रंगाचा लेहेंगा परिधान केलेली मीरा वधूचा चूडा आणि कलीरें अंगावर असतानाच सुमेरच्या तावडीतून सुटण्यासाठी लग्नमंडपडातून पलायन करते.“यातील माझी व्यक्तिरेखा ही स्पष्टवक्त्या मुलीची असून ती सामाजिक बंधनं मानत नाही. ‘कलीरें’ मालिकेमुळेच मला आयुष्यात प्रथमच नववधूच्या वेशात नटण्याची संधी मिळाली असून यात मी लालभडक लेहेंगा,भारी दागिने आणि अर्थातच कलीरें यांच्यासह लग्नापूर्वी पळ काढते.सध्या मालिकेत माझ्या लग्नाचंच कथानक सुरू असलं, तरी बाईकवरून पळ काढम्याचा हा प्रसंग मला विशेष थरारक वाटला आणि ‘मेरे ब्रदर की दुल्हन’ चित्रपटातील कत्रिनाच्या प्रसंगाप्रमाणेच मला हा प्रसंग उभा करायचा होता, ही गोष्टही माझ्यासाठी खास महत्त्वाची होती. मी कतरिनाची फार मोठी चाहती असून मला तिचा फिटनेस आणि फॅशन स्टाइलही फार आवडते. बाईकवरील प्रसंगाचं चित्रीकरण करताना मला खूप मजा आली आणि आता रसिकांना माझ्या लग्नातील हा नाट्यपूर्ण प्रसंग पाहायला आवडेल, अशी आशा करते,” असे आदिती शर्माने सांगितले.