ते आठवलं की आजही अंगावर शहारा येतो..., ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम मुनमुन दत्ताची ‘ती’ धक्कादायक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 11:49 AM2021-10-11T11:49:54+5:302021-10-11T11:51:52+5:30

Munmun Dutta sexual abuse : मुनमुनने एक लांबलचक पोस्ट लिहिली होती. तिची ही पोस्ट वाचून सर्वांनाच धक्का बसला होता. 

When Babita ji aka mummun dutta of Taarak Mehta Ka Ooltah Chashmah revealed about sexual abuse! | ते आठवलं की आजही अंगावर शहारा येतो..., ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम मुनमुन दत्ताची ‘ती’ धक्कादायक पोस्ट

ते आठवलं की आजही अंगावर शहारा येतो..., ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम मुनमुन दत्ताची ‘ती’ धक्कादायक पोस्ट

googlenewsNext
ठळक मुद्देमुनमुन दत्ता काही दिवसांपूर्वी तिच्या रिलेशनशिपच्या बातम्यांमुळे चर्चेत होती. तारक मेहता मालिकेतील टप्पू अर्थात राज अनाकतसोबत मुनमुन रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा मध्यंतरी होत्या.

बॉलिवूडच्या झगमगाटात अनेक रहस्ये दडलेली आहेत. वरवर सगळं काही आनंदी वाटत असलं तरी खोल आत अनेक दु:ख दबा धरून बसलेली आहेत. तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेतील बबीताजी अर्थात अभिनेत्री मुनमुन दत्ता (Munmun Dutta)  हिनं 2017 साली असंच खोलवर रूतून बसलेलं दु:ख जगापुढे आणलं होतं. तिच्या त्या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. या पोस्टमध्ये तिने लैंगिक शोषणाबद्दल (Munmun Dutta sexual abuse)  धक्कादायक खुलासा केला होता.
 तिने एक लांबलचक पोस्ट लिहिली होती. तिची ही पोस्ट वाचून सर्वांनाच धक्का बसला होता. 

काय होती ती पोस्ट...


 
मुनमुनने सोशल मीडिया पोस्टमध्ये तिच्या आयुष्यात झालेल्या लैंगिक शोषणाच्या प्रसंगांबाबत  लिहिलं होतं.  तिने लिहिलं होतं की, ‘हे असं काही लिहिताना ते प्रसंग डोळ्यांपुढे येतात. आजही त्या सर्व गोष्टी आठवल्या की डोळ्यांत पाणी येतं.  जेव्हा मी शेजारचे अंकल व त्यांच्या माझ्या सर्वांगावर रोखलेल्या घाणेरड्या नजरांना घाबरायची. संधी मिळताच ते मला पकडायचे आणि कुणाला काही न सांगण्याची धमकी द्यायचे.   माझा मोठा चुलत भाऊ इतक्या घाणेरड्या पद्धतीनं मला न्याहाळायचा की अजूनही त्यांचा राग येतो. हा तोच माणूस होता ज्याने मला रूग्णालयात माझ्या जन्मावेळी पाहिलं होतं आणि त्यानंतर 13 वर्षांनी तो माझ्या शरीराला स्पर्श करायला आसूसला होता. कारण मी एक वाढती मुलगी होते आणि माझं शरीर बदललं होतं. माझ्या ट्युशनचा शिक्षक, ज्याने माझ्या अंतर्वस्त्रात हात घातला होता. दुस-या एका शिक्षकांना मी राखी बांधली होती, ते क्लासमधल्या मुलींच्या ब्राच्या स्ट्रिप ओढून मग त्यांना रागवायचे. रेल्वे स्टेशनवर एका पुरुषाने मला त्याच्याकडे ओढून घेऊन जबरदस्ती मिठी मारली होती. या सगळ्या किळसवाण्या गोष्टी आठवल्या की आजही अंगावर शहारा येतो. किळस वाटते. कारण काय, तर तुम्ही लहान आहात, बोलायला घाबरत असता. इतकी भीती वाटते की पोटात गोळा येतो. जीव गुदमरतो. आईबाबांना हे सगळं कसं सांगावं? हे तुम्हाला कळतं नसतं. कुणाला याबद्दल एक शब्द सांगतानाही तुम्हाला लाज वाटते. मग  तुम्हाला पुरुषांबद्दल प्रचंड तिटकारा निर्माण होतो. तुम्हाला माहीत असतं की ते यात दोषी असतात. हे असे किळसवाणे प्रसंग, किळसवाणा स्पर्श आयुष्यातून काढून टाकायला अनेक वर्षं लागतात. त्यामुळे मी लैंगिक शोषणाविरुद्धच्या  आंदोलनाचा भाग झाले आहे. 
त्यावेळी मला काहीही करता आलं नाही पण आता जर कुणी पुरुषाने माझ्यासोबत असं वागलाच तर मी त्याला फाडून टाकेल.  मी जशी आहे त्याबद्दल मला अभिमान वाटतो,’
मुनमुन दत्ता काही दिवसांपूर्वी तिच्या रिलेशनशिपच्या बातम्यांमुळे चर्चेत होती. तारक मेहता मालिकेतील टप्पू अर्थात राज अनाकतसोबत मुनमुन रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा मध्यंतरी होत्या. अर्थात मुनमुनने या चर्चा नाकारल्या होत्या.

Web Title: When Babita ji aka mummun dutta of Taarak Mehta Ka Ooltah Chashmah revealed about sexual abuse!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.