जेव्हा निलेश साबळेनं त्याच्या पत्नीला डॉक्टरकी करणार नाही असं सांगितलं तेव्हा..., जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2022 06:07 PM2022-03-18T18:07:16+5:302022-03-18T18:07:59+5:30

Chala Hawa Yeu Dya: निलेश साबळे(Nilesh Sable)च्या पत्नीचे नाव गौरी असून त्यांची लव्हस्टोरी खूप हटके आहे.

When Nilesh Sable told his wife that he would not do medical work ..., find out | जेव्हा निलेश साबळेनं त्याच्या पत्नीला डॉक्टरकी करणार नाही असं सांगितलं तेव्हा..., जाणून घ्या याबद्दल

जेव्हा निलेश साबळेनं त्याच्या पत्नीला डॉक्टरकी करणार नाही असं सांगितलं तेव्हा..., जाणून घ्या याबद्दल

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कॉमेडी रिएलिटी शो चला हवा येऊ द्या (Chala Hawa Yeu Dya) गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. यातील सर्व कलाकार घराघरात पोहचले आहेत. या शोची गेल्या काही वर्षांपासून एकहाती सूत्रे निलेश साबळे (Nilesh Sable) सांभाळतो आहे. तो केवळ निवेदनच नाही तर लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय या सर्व जबाबदाऱ्या लिलया पार पाडतो आहे. निलेश साबळेच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते खूप उत्सुक असतात. त्याच्या पत्नीचे नाव गौरी असून त्यांची लव्हस्टोरी खूप हटके आहे. 

निलेश साबळे हा डॉक्टर आहे हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. त्याचा इथवरचा प्रवास सोप्पा नव्हता. या प्रवासात त्याला साथ मिळाली ती त्याच्या कुटुंबाची. त्याची पत्नी त्याच्यासोबत होती. आयुर्वेदाची एम. एस ही पदवी घेतल्यानंतर निलेशने ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ या कार्यक्रमातून सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले.

निलेश साबळेने ‘फू बाई फू’ या कार्यक्रमातूनही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. त्यानंतर ‘चला हवा येऊ द्या’च्या दिग्दर्शनाची आणि सुत्रसंचलनाची धुरा सांभाळत असताना त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही.

निलेश आणि गौरी एका कॉलेजमध्ये नसतानाही त्यांची ओळख झाली. निलेश एका कार्यक्रमानिमित्त गौरीच्या कॉलेजमध्ये गेला होता. तिथे गौरीसोबत त्याची ओळख झाली. त्यानंतर दोघे एकमेकांचे खूप चांगले मित्र बनले, नंतर या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. मला डॉक्टरकी करण्यात काही रस नाही असे निलेशने गौरीला तेव्हाच सांगून टाकले होते. तू काहीही कर तर माझी तुला साथ असेल, असे गौरीने निलेशला सांगितले. त्यामुळे या दोघांचा हा प्रवास यशस्वी होऊ शकला. 

Web Title: When Nilesh Sable told his wife that he would not do medical work ..., find out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.