"सिरीयल पाहून लोक विचारायचे प्रसाद तुम्हाला पण मारतो का?", मंजिरी ओकने सांगितला 'तो' किस्सा
By कोमल खांबे | Updated: March 30, 2025 11:02 IST2025-03-30T11:01:58+5:302025-03-30T11:02:31+5:30
मंजिरीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत चाहत्याचा एक किस्सा सांगितला.

"सिरीयल पाहून लोक विचारायचे प्रसाद तुम्हाला पण मारतो का?", मंजिरी ओकने सांगितला 'तो' किस्सा
प्रसाद ओक आणि मंजिरी ओक हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल आहे. त्यांच्याकडे आदर्श कपल म्हणून पाहिलं जातं. अनेकदा प्रसाद आणि मंजिरी त्यांचे मजेशीर रील व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. प्रसादचा चाहता वर्ग मोठा आहे. आणि त्याच्या आजवरच्या प्रवासात बायको म्हणून मंजिरीने उत्तमप्रकारे साथ दिली आहे. मंजिरीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत चाहत्याचा एक किस्सा सांगितला.
मंजिरीने नुकतीच 'सुशीला-सुजीत' सिनेमाच्या निमित्ताने न्यूज १८ लोकमतला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने चाहत्याचा एक किस्सा सांगितला. मंजिरी म्हणाली, "जेव्हा प्रसाद अवघाचि संसार मालिका करत होता. त्यात प्रसादचा रोलच असाच होता की त्याच्या आयुष्यातच एक ७-८ बायका असतात. आणि त्यात तो लफडेबाजच दाखवला होता. मालिकेत तो बायकोला मारायचा".
"मला अजूनही काही लोक म्हणतात की ते किती भयानक होते. तुम्हाला पण मारायचे का? मी त्यांना म्हणायचे नाही ओ ते मला का मारतील? आणि तरीही मी एवढी वर्ष का राहीन? पण, असे लोक अजूनही भेटतात. पण, ते भूमिकेशी इतके जोडले जातात. नवऱ्याचं कौतुक म्हणून नाही पण त्याने तो उत्तमप्रकारे वठवला होता. कदाचित त्याचं ते क्रेडिट असावं", असंही पुढे मंजिरी म्हणाली.
दरम्यान, 'सुशीला-सुजीत' या मराठी सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. या सिनेमात स्वप्नील जोशी, सोनाली कुलकर्णी यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर प्रसाद ओक या सिनेमात ५ भूमिकांमध्ये पाहायला मिळणार आहे. या सिनेमाच्या निर्मितीची बाजू मंजिरीने सांभाळली आहे.